scorecardresearch

Premium

योग्य आहार आणि व्यायाम करूनही शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होत नाही? LDL चे प्रमाण कमी कसे करावे? तज्ज्ञ सांगतात…

अनेक लोक योग्य आहार घेऊन, स्वत:च्या जीवनशैलीमध्ये सुधारणेसह व्यायाम करूनही त्यांच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होत नसल्याची तक्रार करतात.

High LDL cholesterol management
LDL चे प्रमाण कमी कसे करावे? (Photo : Freepik)

अनेक लोक योग्य आहार घेऊन, स्वत:च्या जीवनशैलीमध्ये सुधारणेसह व्यायाम करुनही त्यांच्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होत नसल्याची तक्रार करतात. शिवाय या समस्येमुळे ते निराशही होतात. परंतु, त्यांना हे माहिती नाही की, स्वच्छ आहार घेणे आणि योग्य शारीरिक व्यायाम कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतो. अनेक प्रकरणांमध्ये केवळ जीवनशैलीतील बदल औषधांशिवाय पुरेसे नसल्याचं आढळून आलं आहे. याचे कारण म्हणजे बहुतेक लोक त्यांच्या एलडीएलच्या संख्येबद्दल जागरुक असतात पण त्यांना त्याचे स्वरूप समजत नाही. व्यायाम करुनही कोलेस्टेरॉलची पातळी का कमी होत नाही आणि LDL (LDL ला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात, कारण ते हृदयाच्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा करते. जर हृदयाच्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागले तर रक्ताभिसरणासाठी आवश्यक असलेल्या धमन्या अरुंद होऊ लागतात.) च्या अनेक उपश्रेणी नेमक्या शरीरावर काय परिणाम करतात, याबाबतची सविस्तर माहिती डॉ. निशीथ चंद्रा, मुख्य संचालक, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, दिल्ली यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितली आहे ती जाणून घेऊ या.

डॉ. निशीथ चंद्रा सांगतात. आहारातील चांगले बदल एलडीएल नियंत्रणात आणू शकतात, परंतु त्याची पातळी वाढलेली असेल तर त्यासाठी औषधांची गरज भासते. LDL च्या अनेक उपश्रेणी आहेत, मोठे, मध्यम आणि लहान. नंतरचे केवळ लहान नसतात तर दाट कण असतात, जे पेशींच्या पडद्यावर सहज झिरपू शकतात आणि रक्तात फिरू शकतात. भारतीयांची एकूण LDL संख्या कॉकेशियन लोकांपेक्षा कमी आहे. कमी घनतेच्या LDL चे प्रमाण जास्त आहे. हे रक्तवाहिन्यांच्या भिंतींना जास्त विषारी असतात. म्हणूनच, त्यांचा चिकट आणि हट्टी स्वभाव पाहता, त्यांना औषधे आणि जीवनशैलीत बदल करून आक्रमकपणे नियंत्रित करणे गरजेचं आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कमी एलडीएल असलेल्या लोकांमध्ये जास्त एलडीएल असलेल्या लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका ३०० टक्के अधिक असतो. हृदयविकाराचा झटका आलेल्या सुमारे ५० टक्के लोकांच्या रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी ‘सामान्य’ का असते हे यावरून स्पष्ट होते.

World Heart Day 2023
World Heart Day 2023 : अपुऱ्या झोपेमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढतो का ?
Why having leafy vegetables at the beginning of a meal can control your blood sugar better
मधुमेही व्यक्तीने जेवणाच्या सुरुवातीला पालेभाज्या का खाव्यात? डॉक्टरांकडून जाणून घ्या उत्तर
diet colas blood sugar
डाएट कोला प्यायल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते का? नवीन अभ्यासातून समोर आली महत्त्वपूर्ण माहिती….
Health benefits of sweet potatoes why sweet potatoes are an unsung superfood They help you live longer and disease free
रताळे दीर्घकाळ निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर? पण खरंच याच्या सेवनाने कॅन्सर, डोळ्यांचे आजार दूर होतात? वाचा, डॉक्टर काय सांगतात….

हेही वाचा- सफरचंद सोलून खावे की न सोलता? तुम्ही रोज सफरचंद खायला हवे का? डॉक्टरांनी सांगितलं हेल्थचं गणित

तुमची सुरक्षित एलडीएल पातळी काय असावी?

सामान्यतः १०० ते १२९ mg/dL एलडीएलची पातळी योग्य मानली जाते, तर १३० ते १५९ mg/dL अधिक मानले जाते. परंतु भारतीयांसाठी, विशेषत: ज्यांना अद्याप हृदयविकाराचा त्रास झालेला नाही, ही मर्यादा १०० mg/dL पेक्षा कमी असावी. हृदयाच्या रुग्णांसाठी, हे प्रमाण ७० mg/dL पर्यंत खाली असले पाहिजे आणि ज्यांना वारंवार हृदयविकाराचा झटका येतो त्यांनी ते ४० mg/dL च्या खाली ठेवणं आवश्यक आहे.

कमी घनता LDL तुमच्या हृदयावर काय परिणाम करते?

जेव्हा रक्ताभिसरण करणार्‍या LDL चे प्रमाण जास्त होते, तेव्हा ते एंडोथेलियमचे नुकसान करते, एक पातळ पडदा जो हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूस असतो. ते असे पदार्थ सोडतात, जे हृदयाच्या विश्रांतीचे आणि आकुंचनाचे नियमन करतात तसेच रक्त गोठणे, रोगप्रतिकारक कार्य आणि प्लेटलेटचे नियमन करण्यासाठी जबाबदार एन्झाइम्सलादेखील नियंत्रित करतात. जेव्हा हे खराब होते तेव्हा ते हृदयाच्या वाहिन्यांसह प्लेक जमा होण्यास प्रोत्साहन देते आणि अडथळे निर्माण करतात.

याचे कारण असे की विशिष्ट LDL ची रचना अनुवांशिकदृष्ट्या पूर्वनिर्धारित असते. यकृत रक्तातून एलडीएलला त्या रिसेप्टर्सच्या माध्यमातून घेते जे त्याच्याशी जोडलेले असते. जितके जास्त एलडीएल रिसेप्टर्स असतील, तितके रक्तात प्रवाहित होण्याचे त्यांचे प्रमाण कमी होते. परंतु, काही अनुवांशिक विकारांमध्ये असे रिसेप्टर्स कमी होतात आणि अगदी अनुपस्थित असतात. या स्थितीला फॅमिलीअल हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात कोलेस्ट्रॉल जमा होते.

जर तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत जास्त चरबीयुक्त, कमी कार्बोहायड्रेट आहार घेत असाल तर तुमची LDL श्रेणी प्रमाणाच्या बाहेर जाऊ शकते. अतिरिक्त चरबीमुळे तुमचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. याउलट, मे २०२३ मध्ये युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ३० अभ्यासांच्या मेटा-विश्लेषणात असे आढळून आले की, शाकाहारी किंवा वनस्पती आधारित आहारामुळे खराब कोलेस्ट्रॉल २० टक्क्यांनी कमी होऊ शकते; तर आहारातील हस्तक्षेप हे औषधोपचारासाठी उपयुक्त ॲड-ऑन असू शकते; तर तुम्हाला परत रुळावर आणण्यासाठी व्यायाम हा तिसरा आधारस्तंभ आहे. कार्डिओ आणि एरोबिक्सवर लक्ष केंद्रित करा, कारण ते LDL कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल किंवा उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) वाढवतात.

मद्य सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स दोन्ही वाढू शकतात, जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) ने शिफारस केली आहे की, पुरुषांनी आणि महिलांनी जास्त मद्यपान करू नये.

हेही वाचा- Blood Cancer: रक्ताच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे व चिन्हे ओळखा; ‘या’ लोकांना असतो सर्वाधिक धोका 

दाट एलडीएलची ओळख आणि उपचार

तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे LDL आहे हे समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या लिपिड प्रोफाइल चाचणीसह LDL सबफ्रॅक्शन चाचणी घेणे. तुमचे कार्डिओलॉजिस्ट तुम्हाला स्टॅटिन लिहून देईल. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मधुमेह असलेल्या कोणालाही स्टॅटिन घेणे आवश्यक आहे, कारण उच्च रक्तातील साखरेची पातळी हृदयविकाराचा धोका वाढवते. संशोधन असे सूचित करते की, फॅमिलीअल हायपरकोलेस्टेरोलेमिया असलेल्या लोकांमध्ये स्टॅटिनमुळे हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका ७६ टक्क्यांनी कमी होतो.

जे लोक जास्त काळापर्यंत स्टॅटिन सहन करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी बेम्पेडोइक ॲसिड, जे केवळ यकृतातून प्लेक तयार करणाऱ्या LDL ला बाहेर काढून टाकते. ज्याचा स्नायूंवर कोणताही परिणाम न होता किंवा स्टॅटिन्सप्रमाणे स्नायूंमध्ये वेदनाही होत नाहीत. औषधांचा आणखी एक वर्ग आहे ज्याचा वापर LDL कमी करण्यासाठी मदत करतो ज्याला PCSK9 चा अवरोधक म्हटलं जातं. जे महाग इंजेक्शन करण्यायोग्य आणि दर १५ दिवसांनी घ्यावे लागते. याउलट बेम्पेडोइक अ‍ॅसिड दिवसातून एकदा घेतली जाणारी गोळी असून ती खूप महागही नसते. गंभीर प्रकरणांमध्ये, दाट एलडीएल कमी करण्यासाठी दर सहा महिन्यांनी एकदा इनक्लिसिरन इंजेक्शन्स वापरली जातात. तुम्हाला कोणतीही LDL समस्या असल्यास, त्याच्या पातळीचे नियमित निरीक्षण करा – तुम्हाला हृदयविकार नसल्यास सहा महिन्यांतून एकदा आणि तुम्हाला हृदयविकार असल्यास तीन महिन्यांतून एकदा. हे सर्व उपचार सहज उपलब्ध आहेत आणि या बाबतीमध्ये जागरूक राहणं ही सर्वात मुख्य गोष्ट आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is your bad cholesterol level not decreasing despite proper diet and exercise how to reduce the amount of ldl learn from the experts jap

First published on: 20-09-2023 at 18:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×