अनेकांना रात्री झोपेत घोरण्याची सवय असते. घोरणे ही सामान्य बाब असली तरी त्याचा आपल्या घरच्यांना त्रास होतो. घोरणाऱ्याला आपण घोरतोय हे कळत नसते यामुळे आजूबाजूच्या लोकांची झोप उडते. विशेषत: बेड पार्टनरला याचा खूप त्रास होतो. घोरण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. सहसा थकवा आणि सर्दीने नाक चोंदल्यामुळे घोरण्याची समस्या जाणवते. तर काही लोक तणावामुळेही घोरतात. मात्र रोजची घोरण्याची सवय अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते, त्यामुळे घोरण्याची समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी जीभेचे ५ सोपे व्यायाम करून पाहू शकता. हे व्यायाम प्रकार काय आहेत कसे करायचे जाणून घेऊया…

एका रिसर्चनुसार, भारतात २० टक्के लोकं रोज घोरतात तर ४० टक्के लोकअधूनमधून केव्हातरी घोरतात. यामुळे घोरण्यापासून सुटका करुन घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय युक्त्या करून पाहतात. मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) चे डॉक्टरांनी झोपण्याच्या वेळेस व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय वंशाचे ब्रिटीश डॉक्टर करण राज यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी जिभेचे काही सोपे व्यायाम आहेत ज्यामुळे घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

career in Commercial pilot how to become a commercial pilot
चौकट मोडताना : सारेच सुंदर… तरीही विषाद         
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
kondhwa police arrested robbers
पुणे: कोंढव्यात दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड; तीक्ष्ण शस्त्रे, दुचाकी जप्त
vasai police station
वसई: सावकारीचा गुन्हा दाखल होण्याची भीती, पती-पत्नीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
abortion, rape victim, High Court,
गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Thane education officer, suspension,
ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबनाबाबत तूर्त दिलासा नाही, राज्य सरकारला राक्षे यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
leopard Viral Video
आयत्या पिठावर रेघोट्या! बिबट्याची शिकार हिसकावण्याच्या प्रयत्नात ‘या’ प्राण्याचा झाला गेम; बिबट्यानं असं काय केलं? पाहा Video

१) घोरण्याच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी जीभ तोंडाबाहेर काढा, ती एकदा उजव्या बाजूला, एकदा डाव्या बाजूला हलवा. तसेच तोंडाच्या वरच्या बाजूला जीभेने स्पर्श करा.

२) घोरण्याची समस्या रोखण्यासाठी तुम्ही जीभ पाच सेकंद बाहेर ठेवा आणि काही काळ त्याच स्थितीत ठेवावी लागेल. नंतर जीभ पुन्हा तोंडाच्या आत घ्या. यासाठी तुम्ही चमचीही मदत घेऊ शकता. हा व्यायाम तीन ते चार वेळा करा. यामुळे जीभेचे स्नायू मजबूत होतील.

३) जीभ तोंडात एका बाजूने दुसऱ्या बाजूला फिरवत राहा. यामुळे गळा, तोंड आणि शरीराच्या कोणत्याही भागात रक्ताच्या किंवा कोणत्याही गाठी तयार होणार नाहीत. तसेच घोरण्यापासूनही आराम मिळेल.

४) तुम्ही एका गालावर बोट ठेवून जीभ विरुद्ध बाजूला ढकला. आता दुसऱ्या गालावर बोट ठेऊन जीभ त्याच्या विरुद्ध बाजूने ढकला. असे थोड्या अंतराने तीन ते चार वेळा करा. तुम्ही जितक्या नियमितपणे याचा सराव कराल तितक्या लवकर तुमची घोरण्याची समस्या दूर होईल.

५) यानंतर जीभ उलटी टाळूवर लावा, पाच सेंकद तसेच थांबा. यामुळे तुमच्या घशाच्या मागच्या बाजूचे स्नायू मजबूत होतील.

या व्यायाम प्रकारांमुळे तुमच्या जीभ आणि घश्याचे स्नायू मजबूत होतील. जिभेचे स्नायू बळकट झाल्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि घोरण्याची समस्याही दूर होईल.

घोरण्याची सवय ठरेल धोकादायक

  • घोरण्याची समस्या स्लीप एपनियामध्ये बदलू शकते. यामुळे रक्तदाब वाढतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. याशिवाय घोरण्यामुळे व्यक्ती अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकते.

घोरण्यामागची कारणे आणि उपाय

जास्त दारू पिणे, वाढते वजन, धूम्रपान करणे, पाठीवर झोपणे यामुळे देखील घोरण्याची समस्या उद्भवते. याशिवाय स्लीप एपनिया सारख्या परिस्थिती देखील घोरण्याचे कारण आहे.

फुफ्फुसात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे घोरण्याची समस्या उद्भवते. या समस्येवर दीर्घकाळ उपचार न केल्यास मेटाबॉलिक सिंड्रोम, मधुमेह, हृदयविकार होऊ शकतात. घोरण्याच्या सामान्य उपचारांमध्ये वजन कमी करणे, झोपण्याची स्थिती बदलणे, CPAP मशीनचा वापर यांचा समावेश होतो. CPAP मशीन फुफ्फुसात जाणाऱ्या हवेवर दबाव निर्माण करते. या दाबामुळे श्वास घेताना अडचण येत नाही आणि गाढ झोप लागते.