Parenting Tips : प्रत्येक पालकाला वाटतं की, आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा आणि शालेय जीवनात प्रगती करावी; पण अनेक पालकांच्या तक्रारी असतात की, त्यांची मुलं अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यास करायचा कंटाळा करतात. पालकांनो, जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील, तर टेन्शन घेऊ नका. या खास टिप्सच्या मदतीनं तुम्ही तुमच्या मुलांना अभ्यास करण्याची सवय लावू शकता. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
जर तुम्हाला वाटतं की, तुमच्या मुलांनी अभ्यास करावा, तर सर्वांत आधी त्यांची इतर मुलांबरोबर तुलना करण्याची सवय सोडून द्या. इतर मुलांबरोबर तुलना केल्यामुळे मुलांचं अभ्यासात मन लागणार नाही.
जर तुम्ही मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रेरित करीत असाल, तर कदाचित तुमची मुलं अभ्यास करू शकतात. चांगल्या गोष्टींसाठी मुलांना नेहमी प्रोत्साहन द्या.




पालकांनी नेहमी काळजी घ्यावी की, मुलांना कधीही अभ्यासाचा दबाव किंवा तणाव जाणवणार नाही. मुलांनी आवडीनं अभ्यास करावा यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. पालकांनी वारंवार मुलांच्या शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे.
मुलांच्या अभ्यासातील अडचणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना अभ्यासातील कठीण गोष्टी सरळ आणि सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करावा; ज्यामुळे मुलांना अभ्यासात आवड निर्माण होईल.
हेही वाचा : याला म्हणतात नशीब! मालकीणबाई करतेय कुत्र्याची मालिश, व्हायरल VIDEO एकदा पाहाच
अनेकदा मुलं अभ्यास करीत नाहीत म्हणून पालक दिवस-रात्र मुलांना अभ्यास करायला सांगतात; पण हे चुकीचं आहे. त्यामुळे मुलांना अभ्यास करणं कंटाळवाणं वाटू शकतं.
अभ्यासाचं एक वेळापत्रक बनवा आणि त्यानुसारच मुलांना अभ्यास करायला सांगा. सलग ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मुलांना अभ्यास करू देऊ नका.
मुलं दिवसभर खेळतात; त्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप येते. अशा वेळी झोप येत असताना जर तुम्ही मुलांना अभ्यास करण्यास सांगितलं तर मुलांना त्याचा त्रास वाटू शकतो. त्यामुळे नियमित आठ तास झोप मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. झोप नीट झाल्यामुळे त्यांचं अभ्यासात मन लागू शकतं.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)