Right time to eat food : रोज आपण धावपळ करतो घरातील कोणतीही काम करतो त्यासाठी जी एनर्जी लागते ती अन्नातून मिळत असते. मात्र किती लोकं रोजच्या जेवणाच्या वेळा तंतोतंत पाळतात. वेळच्या वेळी जेवण करतात. फार कमी लोकं आहेत जे जेवणाच्या वेळा पाळतात. जर तुमची खाण्याची वेळ योग्य असेल तर तुम्ही स्वतःला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकता, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारून तुम्ही स्वतःला अनेक धोकादायक आजारांपासून वाचवू शकता. जर आपण आपल्या खाण्याच्या सवयी सुधारल्या तर आपण लठ्ठपणा, मधुमेह आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळू शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येकाने दिवसातून तीनही वेळा जेवण्याच्या वेळेकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. चला तर मग नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेऊया.

जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या?

नाश्ता कधी करावा?

तज्ज्ञांच्या मते, सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही योग्य वेळी नाश्ता केला पाहिजे. यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी ७ ते ८ आहे. न्याहारी सकाळी १० नंतर कधीही करू नये. हे लक्षात ठेवले पाहिजे की सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांच्या आत काहीतरी खावे.

दुपारच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

दुपारच्या जेवणाचीही वेळ असते, यानंतर दुपारचे जेवण केल्यास शारीरिक समस्या वाढू शकतात. दुपारी १२.३० ते २ पर्यंत जेवणाची उत्तम वेळ आहे. यामध्ये न्याहारी आणि दुपारच्या जेवणातही चांगले अंतर आहे. दुपारचे जेवण दुपारी ४ नंतर कधीही घेऊ नये. यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान ४ तासांचे अंतर असावे हे लक्षात ठेवा.

हेही वाचा >> तुम्हीही तळलेले पदार्थ टिश्यू पेपरवर ठेवता का? थांबा…डॉक्टरांनी सांगितला धोका

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल तर रात्रीचे जेवण संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत करा. रात्री ९ नंतर कधीही अन्न खाऊ नये. झोपण्याच्या ३ तास ​​आधी अन्न खाणे आरोग्यासाठी चांगले असते.