scorecardresearch

या सेलिब्रिटींना आला होत हृदयविकाराचा झटका, आपल्या हृदयाची काळजी घ्या, ‘हे’ करा

व्यायाम करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनाच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक कलेकारांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. हृदयविकाराच्या समस्या टाळण्यासाठी पुढील गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.

या सेलिब्रिटींना आला होत हृदयविकाराचा झटका, आपल्या हृदयाची काळजी घ्या, ‘हे’ करा
हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार आता तात्काळ उपचार, राज्यात 'स्टेमी-महाराष्ट्र' प्रकल्प राबवणार

धावपळीचे जीवन, अयोग्य आहार यामुळे आरोग्याला मोठे नुकसान होत आहे. वजन वाढण्यासह अनेक समस्या उद्भवत आहे. लोकांना हृदयाचे विकार होत आहेत. अलिकडे अनेक सेलिब्रिटींचा हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला आहे. व्यायाम करताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनाच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक कलेकारांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. हृदयविकाराच्या धोका टाळण्यासाठी पुढील गोष्टी केल्यास फायदा होऊ शकतो.

या सेलिब्रिटींना आला होता हृदयविकाराचा झटका

१) गायक केके

लोकप्रिय गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. केके लाईव्ह कॉन्सर्ट करत होते. गाणे गाता गाता त्यांना त्रास होऊ लागला. नंतर त्यांचा मृत्यू झाला.

२) दीपेश मान

अभिनेता दीपेश मान यांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ‘भाभीजी घरपर है’ मधील त्यांचे पात्र प्रचंड गाजले होते. या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवले होते.

(दीपिका पादुकोणला हृदयाची ‘ही’ समस्या, हृदयगतीमध्ये पडतो फरक)

३) रीमा लागू

दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांनी ‘हम आपके है कौण’ सारख्या गाजलेल्या चित्रपटामध्ये काम केले होते.

४) सिद्धार्थ शुक्ला

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यावेळी सिद्धार्थ यांचे वय केवळ ४० वर्षे होते.

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे करा

1) व्यायाम करा

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी नियमित योग व्यायाम केला पाहिजे. रोज ३० मिनिट व्यायाम करणे, चालने, स्ट्रेचिंग केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. वजन वाढणे, मधुमेह, उच्च रक्तदाब सारख्या समस्या दूर करण्यात देखील व्यायाम मदत करते.

(वजन घालवण्यासाठी रात्रीचे जेवण टाळण्याऐवजी ‘हा’ फायबरयुक्त आहार घ्या, भूक लागणार नाही)

२) पौष्टिक आहार घ्या

हदय निरोगी ठेवण्यासाठी पोष्टिक आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. बाहेरचे तेलकट, तळलेले पदार्थ खाण्याऐवजी फळ आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केले पाहिजे. आहारामध्ये डाळी, प्रथिनेयुक्त अन्न पदार्थांचा समावेश केला पाहिजे. अधिक मिठ असलेले पदार्थ टाळावे.

३) धुम्रपान करू नये

धुम्रपान करणे हे हृदयाला नुकसान पोहोचवू शकते. धुम्रपानामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी मद्य, धुम्रपानाची सवय मोडावी. त्याचबरोबर ताण घेऊ नये. ताण घेतल्याने देखिल हृदयविकाराची समस्या निर्माण होऊ शकते. ध्यान करा. याने ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या