आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांच्यावर आसी घाटानजिक भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भारती चित्रवाणीवरील कार्यक्रमावरून परतत होते. त्यांच्या वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या.यात भारती यांना किरकोळ दुखापत झाल्याचे आपचे वाराणसी येथील समन्वयक रामानंद राय यांनी सांगितले.
जवळपास २० लोकांनी भारती यांच्या वाहनाला घेराव घालून हल्ला केल्याचा दावा राय यांनी केला. निवडणुकीशी संबंधित एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यक्रमासाठी भारती गेले असताना त्यांच्या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. या झटापटीत भारती यांना वाहनचालक आणि दोन कार्यकर्ते जखमी झाले. भाजप कार्यकर्त्यांनी शिविगाळ केल्याचा आरोपही भाजपने केला आहे.  मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच रक्तरंजित राजकारण सुरु केल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ता आली तर ते कसे वागतील असा सवाल भारती यांनी केला. भाजप अशा प्रकारच्या हिंसेवर विश्वास ठेवत नाही अशी प्रतिक्रिया प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी दिली