06 July 2020

News Flash

सिंधुदुर्गातील आघाडीचा वाद अखेर पवारांकडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी नवी मुंबई येथे आमदार दीपक केसरकर यांची चर्चा झाली.

| April 12, 2014 05:17 am

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी नवी मुंबई येथे आमदार दीपक केसरकर यांची चर्चा झाली. त्या पाश्र्वभूमीवर उद्या शनिवार १२ एप्रिल रोजी श्रीधर अपार्टमेंटमध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गात काँग्रेस व राष्ट्रवादीत बिघाडी निर्माण झाल्यानंतर दिलजमाईचा प्रयत्न सुरू झाला आहे. उदय सामंत, प्रदेश कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीलाही राष्ट्रवादीने झिडकारले आहे.आज नवी मुंबई कळंबोली येथे आमदार दीपक केसरकर यांनी  पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले. त्यांनी तपशील सांगण्यास नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2014 5:17 am

Web Title: sharad pawar to take charge of sindhudurg issue
Next Stories
1 अडवाणींना दूर केले, अदानींसाठी मात्र पायघडय़ा
2 मोदींसाठी पत्नीची प्रार्थना
3 हे काँग्रेसच्या नैराश्याचे द्योतक
Just Now!
X