देशाचे नेतृत्व कसे असले पाहिजे, ते कसे आहे, इत्यादी गोष्टींवर आपण अनेकांची मते, त्यांचे विचार ऐकत आलो आहोत. पण अशा प्रकारे आपले सरकार काय करते आहे आणि काय करत नाही आहे, यावरची बाष्कळ बडबड करण्यापेक्षा आपण या समाजासाठी काय करू शकतो, याचा आपण प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला हवा. आणि मग एक समाज म्हणून आपण देशासाठी कसे योग्य कार्य उभारू शकतो हा फरक खरेतर आपण आपल्या कृतीतून दाखवून द्यायला हवा आहे. माझी या देशातील सर्व तरुणांना विनंती आहे की नुसती वायफळ चर्चा करण्यात वेळ फुकट घालवू नका. त्यापेक्षा मतदान करा. तुमचे विचार जिथे आहेत त्यांना  निवडून द्या. तुमचे भविष्य तुम्ही इतरांवर सोपवू नका. हा आपला देश आहे, आपली संपत्ती आहे, हे लक्षात घेऊन आजच तुमची भूमिका काय आहे, ती कशी असली पाहिजे हे ठरवा आणि ते विचार प्रत्यक्ष कृतीत आणा.