02 March 2021

News Flash

पर्यायी सरकार स्थापण्यासाठी सर्वाधिकार शरद पवारांना-नवाब मलिक

नवाब मलिक यांची पत्रकार परिषदेत माहिती

राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. अजित पवार यांनीही मार्गदर्शन यांनी केलं आहे. शरद पवारांना आम्ही सर्वाधिकार दिले आहेत. असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. एक समिती गठीत होईल. समिती आणि शरद पवार यांची सरकार स्थापनेबाबत चर्चा होणार आहे.

दिल्लीहून काँग्रेसचं शिष्टमंडळ येेईल. आमच्याकडे आजच्या घडीला बहुमत नाही हे स्पष्ट आहे. काँग्रेसला सोबत घेऊनच पुढचा निर्णय घेऊ आणि शिवसेनेलाही सोबत घेऊ कारण तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार होऊ शकत नाही. अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे यांची वाट पाहतो आहोत. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही बैठक होईल असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- काँग्रेस-राष्ट्रवादीची रद्द झालेली भेट पुन्हा ठरली

नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांना संबोधित केलं. त्याचवेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा अभूतपूर्व पेच निर्माण झाल्यानंतर आता पुढे काय करायचं याचा निर्णय शरद पवारांच्या हाती असणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 2:53 pm

Web Title: well empower sharad pawar ji to take a decision on alternative govt says nawab malik scj 81
Next Stories
1 राज्यपाल हे भाजपाचे बाहुले आहेत का?; सचिन सावंत यांची टीका
2 अनुभवी सरकारसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा – आशिष देशमुख
3 महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस- सूत्र
Just Now!
X