रविवारी साताऱ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात आरपीआयचं पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार पडलं. या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सातारा दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपा खासदार उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले एकाच मंचावर उपस्थित होते. दरम्यान, उदयनराजे यांनी रामदास आठवलेंसाठी खास कविता सादर केली. उदयनराजेंची कविता ऐकून व्यासपीठावर एकच हशा पिकला.

खरं तर, कोणताही कार्यक्रम असो वा संसदेतील भाषण असो केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या हटक्या शैलीत कविता सादर करत असतात. त्यांच्या कविता अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण साताऱ्यातील आरपीआयच्या मेळाव्यातून उदयनराजेंनी रामदास आठवलेंसाठी मिश्किल कविता सादर केली आहे.

हेही वाचा- भुजबळांनी शरद पवारांवर टीका करताच कार्यकर्त्यांची आरडाओरड? जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ज्यांचं खाल्लं, प्यायलं…”

आठवलेंवर कविता सादर करताना उदयनराजे म्हणाले, “आमच्या मनात आहेत, रामदासजी आठवले… म्हणूनच आम्ही त्यांना गटवले…” उदयनराजेंची ही मिश्किल कविता ऐकताच व्यासपीठावरील सर्व नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. स्वत: उदयनराजेंनाही हसू आवरता आलं नाही. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- “टरबुजालाही पाणी लागतं”; उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले, “सर्वस्व गेलेल्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदयनराजे पुढे म्हणाले, “खरं तर, मला कविता करता येत नाहीत. पण दिल्लीला गेल्यावर मी रामदास आठवलेंकडून कविता शिकून घेतो. म्हणजे पुढच्या वेळी आणखी चांगल्याप्रकारे कविता सादर करता येईल.”