Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कऱ्हाड या ठिकाणी एक सभा घेतली. या सभेत त्यांनी शरद पवारांनी दिलेल्या मंत्राचा उल्लेख केला. उत्तर कऱ्हाडमध्ये भाकरी फिरणार असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले. त्यांच्या याविधानाची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

“कऱ्हाडची भूमी ही ऐतिहासिक आहे. या इतिहासात महाराष्ट्राची जडणघडण आहे. मात्र मागची २५ वर्षे ज्या विकासाची अपेक्षा ठेवतं, जे परिवर्तन व्हायला हवं तसंच वारंवार लोकप्रतिनिधी पाठवतो. मात्र कऱ्हाडमध्ये परिवर्तन होईल.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आता सगळ्यांनी मिळून ठरवलं की मनोज दादाला उमेदवारी द्यायची. उत्तर कऱ्हाडच्या जबरदस्त परिवर्तनाचा चेहरा मनोज घोरपडे आहेत. हा सगळा कृष्णेकाठचा भाग ज्या भागांत अनेक नद्यांचा उगम होतो. ज्या भागाने महाराष्ट्राला पाणीदार केलं अशा ठिकाणीही आपल्याला दुष्काळ दिसतो. २०१४ ते २०१९ या कालावधीत दुष्काळाविरोधात आपल्याला काम करता आलं. सगळ्या योजनांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन दुष्काळी भागांचा चेहरा बदलण्याचं काम आपण केलं. असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nilesh Rane :
Nilesh Rane : ‘माझ्या मागून आलेले आमदार अन् मंत्री झाले, मी अजून…’, निलेश राणेंच्या विधानाची चर्चा
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे पण वाचा-Jitendra Awhad : “…मग मुनगंटीवार का पडले?” व्होट जिहादच्या दाव्यांवरून आव्हाडांचा फडणवीसांना खोचक प्रश्न

मनोज घोरपडेंना विजयी करण्याचं आवाहन

मनोज घोरपडेंना विजयी करा, १०० मीटरचं हेड करुन देतो आणि प्रत्येक ठिकाणी पाणी पोहचवण्याचा शब्द हा देवाभाऊ तुम्हाला देतो आहे. आज विरोधी पक्षात असतानाही कऱ्हाड उत्तर साठी १ हजार कोटी रुपयांचा निधी आणला. विरोधी पक्षात राहून जर इतका निधी आणला तर कमळ फुलल्यानंतर आपण किती निधी आणू शकतो विचार करा असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. पाच वर्षांत आपण २५ वर्षांचा बॅकलॉग भरुन काढू. काही कमी पडलं तर उदयन महाराजे आहेत. महाराजांच्या एका म्हणण्यावर मोदीजी तिजोरी खुली करतील तुम्ही चिंताच करु नका असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांचा मंत्र आम्हाला उपयोगी पडला

महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत. मात्र विरोधकांनीही चांगली गोष्ट सांगितली तर त्या गोष्टीचा अवलंब आपण केला पाहिजे. मागच्या काळात राजकाणाबाबत बोलत असताना शरद पवार असं म्हणाले होते की तव्यावरची भाकरी वेळेवर फिरवली नाही तर ती करपते. आता शरद पवारांना सांगा उत्तर कऱ्हाडमधली तुमची भाकरी फिरवायची वेळ आली आहे. नाहीतर आमचं उत्तर कऱ्हाड करपल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शरद पवारांनी दिलेल्या मंत्राप्रमाणे उत्तर कऱ्हाडकर भाकरी फिरवणार आहेत. मनोजदादाला मुंबईच्या विधानसभेत पोहचवणार आहे. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

Story img Loader