scorecardresearch

Premium

“का उगाच…”; संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंसहीत शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना आवाहन

“महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,” असं म्हणणाऱ्या राऊतांचं आवाहन

Shivsena Eknath Shinde
ट्विटरवरुन राऊत यांनी दिली ऑफर

राज्यातील सत्ता संघर्षावर चर्चेमधून तोडगा निघू शकतो अशी थेट ऑफर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना दिलीय. काल म्हणजेच २२ जून रोजी “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,” असं म्हणणाऱ्या राऊत यांनी ट्विटरवरुन थेट बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

संजय राऊत यांनी ट्विटरुन मोजक्या शब्दांमध्ये बंडखोर नेत्यांना चर्चेचं आवाहन दिलंय. “चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत,” असं राऊत म्हणाले आहेत. पुढे बोलताना राऊत यांनी बंडखोर नेत्यांना विरोधी पक्षासोबत जाण्याची काय गरज आहे अशा आशयाचा प्रश्न विचारलाय. “का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ,” असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

Chandrakant Khaire
“महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?
Supriya Sule criticizes BJP
सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, “दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात”
Maharashtra Janata Dal
महाराष्ट्र जनता दलाला देवेगौडा यांची भूमिका, भाजपाशी युती अमान्य
Mahadev Jankar
“इंडिया आघाडीकडं महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागांची मागणी केली, पण…”, जानकरांचं मोठं विधान

नक्की वाचा >> “अजित पवारांसारखं एकनाथ शिंदेंचं बंड फसणार नाही, कारण…”; आठवलेंचं वक्तव्य, कविताही केली सादर

दरम्यान, मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी २४ तासांमध्ये बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन आपली भूमिका मांडावी असं आवाहन केलं आहे. थेट समोर येऊन आपलं म्हणणं मांडलं तर शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा विचार करु शकते असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde maharashtra political crisis sanjay raut appeal rebel mla to come forward for discussion scsg

First published on: 23-06-2022 at 18:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×