scorecardresearch

चेहऱ्यावर ‘प्लॅस्टिक कवच’ का लावलं? चंद्रकांत पाटलांनी स्वत:चं दिलं उत्तर, म्हणाले…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेसशील्ड लावल्याचा कारण सांगितलं आहे. काही वर्षांपूर्वी पाटील यांच्या डोळ्यात कॅन्सर च निदान झालं होतं.

चेहऱ्यावर ‘प्लॅस्टिक कवच’ का लावलं? चंद्रकांत पाटलांनी स्वत:चं दिलं उत्तर, म्हणाले…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेसशील्ड लावल्याचा कारण सांगितलं आहे. काही वर्षांपूर्वी पाटील यांच्या डोळ्यात कॅन्सर च निदान झालं होतं. शाईफेक झाली तेव्हा डोळा डॉक्टरांनी स्वच्छ केला. त्यांनी डोळा जपायचा सल्ला दिला. अनेकांना माझ्यावर शाईफेक केल्याचा आनंद मिळतो. तस असेल तर माझ्यावर शाईफेक करावी. काही घटना घडलीच तर समोरील व्यक्तीला शाईफेक चा आनंद मिळेल आणि माझा डोळा फेसशील्डमुळे वाचेल म्हणून मी फेसशील्ड वापरण्याच ठरवलं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये सांगवीत पवना थडी जत्रेत बोलत होते. 

हेही वाचा >>>VIDEO: शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, चेहऱ्याला लावलं ‘प्लॅस्टिक कवच’

पिंपरी- चिंचवडमधील सांगवीत पवना थडी जत्रेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेसशील्ड लावून हजेरी लावली. यामुळं शाईफेक ची घटना आणि शाईफेक प्रकरणी आलेली धमकी याबाबत खबरदारी म्हणून चंद्रकांत पाटील यांनी फेसशील्ड वापरल्याची चर्चा होती. याबाबत स्वतः चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात फेसशील्ड वापरण्याच कारण सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर्वांना आश्चर्य वाटत असेल की मी फेसशील्ड का लावलं आहे. अनेकांना माझ्यावर शाई फेकण्यामध्ये आनंद वाटतो. डॉ. बाबासाहेबांचा अनुयावी म्हणनाऱ्याने कायदा हातात घेतला. पुढे ते म्हणाले की, तुम्हाला आनंद मिळणार असेल तर शाईफेक करा. पण माझ्या डाव्या डोळ्यामध्ये कॅन्सर च निदान झालं होतं. शाईफेक नंतर डॉक्टरांनी डोळा स्वच्छ केला. डॉक्टरांनी मला सूचना केली, की डोळा जपा. म्हणून, फेसशील्ड लावून फिरायचं ठरवलं आहे. पोलिस आणि कार्यकर्ते झोपा काढत नाहीत. पण, काही घटना घडली तर त्यांना शाईफेक केल्याचा आनंद मिळू दे….माझा डोळा वाचला पाहिजे. म्हणून मी फेसशील्ड वापरतो आहे अस पाटील यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 22:20 IST

संबंधित बातम्या