Maharashtra Politics Highlights , 08 August 2025 : लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २५ जागा केवळ ३३ हजारांच्या मताधिक्याने जिंकल्या आणि या जागांमुळेच मोदी सत्तेवर टिकून राहिले, अशी टीका त्यांनी केली. यासाठी त्यांनी एका मतदारसंघातील मतदारांसी माहिती गोळा करून कथित पुरावे देखील सादर केले आहेत. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रतिक्रियांवर आपलं लक्ष असेल.
इंडिया आघाडी आता निवडणूक आयोगाच्या मुख्यायलयावर मोर्चा नेणार आहे. तर, आयोगाने राहुल गांधी यांना भेटीचं निमंत्रण दिलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरही आपलं लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्राजंल खेवलकर यांच्या महिला आयोगाने गंभीर आरोप केले आहेत. चित्रपटात काम देण्याचं अमिष दाखवूम मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आयोगाने केला आहे. यासह राज्यासह देशातील इतर राजकीय घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Mumbai Maharashtra Breaking News Live Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय व समाजिक बातम्यांचा आढावा वाचा एकाच क्लिकवर.
चांदवडजवळ टेम्पो धडकल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १२ जखमी
शिवसेना ठाकरे गट-मनसे ऋणानुबंध घट्ट करण्याच्या वाटेवर…
अमली पदार्थविरोधी प्रचार शिवसेना ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये वादाचे कारण ?
"जळगावमधील लोकप्रतिनिधींचे विकासाकडे लक्ष कमी आणि…" केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची खंत
गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना जाहीर; किती पदांची भरती? अर्ज भरण्याची मुदत काय?
रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओवाळणी देण्याची कोणी केली मागणी?
न्यूक्लियस बजेट योजनेला प्रतिसाद; उत्तर महाराष्ट्रात हजारपेक्षा अधिक जणांची नोंदणी
‘ईडी’ ने आता तरी धडा घ्यावा… छगन भुजबळ यांचे कार्यपद्धतीवर बोट
तापीवरील पाडळसरे प्रकल्पाला अखेर चालना… ८५९ कोटींच्या निधीला मंजुरी
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या उदघाटनाच्या दिवशी प्रवास मोफत
मुंबई : छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या… तिघांना अटक
पत्नीच्या वागणुकीमुळे पुरुषांमध्ये वाढते नैराश्य! समाजातील अबोल मानसिक आरोग्य समस्या…
शरद पवार भाजपाशी हातमिळवणी करतील किंवा त्यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होईल अशी अफवा पसरवली जात आहे. शरद पवारांचे एके काळचे जवळचे सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, "अशी माहिती तुम्हा पत्रकारांना कुठून मिळते ते माहिती नाही. परंतु, शरद पवार भाजपात येणं किंवा त्यांनी भाजपाचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही. "