Mumbai Maharashtra News Today : शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यासाठी काल (२० फेब्रुवारी) विशेष अधिवेशनात विधेयक मंजूर करण्यात आले. परंतु, हे आरक्षण मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांना मान्य नाही. ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी त्यांची आग्रही मागणी आहे. त्याकरता ते पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत. तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीकरता देशभर पक्षांतर मोहिमांना जोर आला आहे. महाराष्ट्रातही विरोधी पक्षातील नेते महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.

Live Updates

Maharashtra News Live 21 February 2024 :  महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर

20:49 (IST) 21 Feb 2024
सुनील तटकरे स्पष्टच बोलले, “सुनेत्रा पवारच बारामतीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार”

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारच बारामतीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याचे बुधवारी पुण्यात स्पष्ट केले.

सविस्तर वाचा...

20:48 (IST) 21 Feb 2024
दिल्लीनंतर पुणे पोलिसांचा सांगलीत छापा, आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचे मेफेड्रोन जप्त

पुणे पोलिसांनी आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. दिवेश चिरंजीत भुटिया, संदीप राजपाल कुमार (दोघे रा. नवी दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सविस्तर वाचा...

20:24 (IST) 21 Feb 2024
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचे सर्वाधिकार कोणाला?…सुनील तटकरे यांनी सांगितले ‘हे’ नाव

महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची विद्यमान स्थिती, पक्षीय बलाबल आणि ताकद पाहून जागांची मागणी केली जाणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

19:31 (IST) 21 Feb 2024
“तरुणाईने मुस्कटदाबीला संवैधानिक मार्गाने उत्तर दिले पाहिजे”, साहित्यिक डॉ. किशोर कवठे यांचे आवाहन; गडचिरोलीत युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

देशात वाढती राजकीय अस्थिरता, एकल धर्मांधता यामुळे भूमिका निर्माण होण्याच्या वयात तरुणांमध्ये संभ्रम आणि नकारात्मकता वाढीला लागली आहे, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. किशोर कवठे यांनी केले.

सविस्तर वाचा...

19:23 (IST) 21 Feb 2024
निवासी डॉक्टर राज्यव्यापी संपावर ठाम, गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून जाणार संपावर

निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने गुरूवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा...

19:13 (IST) 21 Feb 2024
चंद्रपूर : पोटच्या गोळ्यानेच आईला संपवले, कुऱ्हाडीने केली हत्या; वडील जखमी

शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशावरून त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

सविस्तर वाचा...

19:04 (IST) 21 Feb 2024
सोलापुरात मेफेड्राॅन निर्मिती करणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला अखेर अटक

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या अंमली पदार्थ उत्पादनासह विक्रीशी संबंधित टोळीच्या म्होरक्यासह दोघांना जेरबंद केले आहे. आतापर्यंत या टोळीच्या एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

18:50 (IST) 21 Feb 2024
‘आमच्या गावात विकसित भारत संकल्प यात्रा नको’, ‘या’ ग्रामपंचायतीचा ठराव चर्चेत

राज्य शासनाच्या आदेशाने ठिकठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु शेतीचा हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागात नागरिक व्यस्त आहेत.

सविस्तर वाचा...

18:16 (IST) 21 Feb 2024
कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके सापडली, आरोपींचा शोध सुरू

सकाळी साडे अकरा वाजता दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण ५४ स्फोटके (डिटोनेटर्स) कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहेत.

सविस्तर वाचा...

17:58 (IST) 21 Feb 2024
सांगली : मिरजेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा केंद्राकडे प्रस्ताव

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीनंतर केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:43 (IST) 21 Feb 2024
आग्रह झाला तरी लोकसभा लढवणार नाही – पालकमंत्री सुरेश खाडे

कोणी कितीही आग्रह केला तरी मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे विधान पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले आहे.

सविस्तर वाचा...

17:33 (IST) 21 Feb 2024
सोलापूर : बारावी परीक्षेत एकही काॅपी सापडल्यास संबंधित शाळेवर फौजदारी कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

इयत्ता बारावी परीक्षेला बुधवारी प्रारंभ झाला. त्यानंतर येत्या १ मार्चपासून दहावीची परीक्षाही सुरू होणार आहे.

सविस्तर वाचा...

17:26 (IST) 21 Feb 2024
ठाणे : रेल्वेगाडीत महिलेचे छायाचित्र काढून विनयभंग

एक्स्प्रेस रेल्वेगाडीमध्ये महिलेचे मोबाईलवर छायाचित्र काढून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा...

17:14 (IST) 21 Feb 2024
"मनोज जरांगे शातिर माणूस, तो स्वतःचाच फायदा बघतो", अजय महाराज बारस्कर यांचा आरोप

"मनोज जरांगेंनी संत तुकाराम महाराजांचा अपमान. तो सर्वांत शातिर माणूस आहे. तो फक्त स्वतःचा फायदा पाहतो. त्यानेच उद्धव ठाकरेंना शाष्टी पिंपळगावच्या आंदोलनात प्रचंड शिव्या दिल्या होत्या. आपल्या मूळ भूमिकेपासून मनोज जरांगे सतत बदलतो", अजय महाराज बारस्कर यांचा आरोप

16:27 (IST) 21 Feb 2024
पिंपरी : मोरवाडीत औद्योगिक कच-याला आग; सर्वत्र धुराचे लोट

पिंपरी : मोरवाडी न्यायालयाच्या मागील बाजूला मोकळ्या जागेतील औद्योगिक कचऱ्याला बुधवारी दुपारी आग लागली. रबर, प्लास्टिक कचऱ्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत.

सविस्तर वाचा...

16:25 (IST) 21 Feb 2024
डोंबिवलीत रविवारी तिरुपती बालाजी महोत्सव; तिरुमाला देवस्थान, डाॅक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे संयोजन

ज्या भाविकांना तिरूपती येथे जाऊन बालाजीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, त्यांना स्थानिक पातळीवर दर्शनाची संधी उपलब्ध करून देणे, हाही या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सविस्तर वाचा...

16:24 (IST) 21 Feb 2024
भाईंदर : बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा त्रास, जागोजागी सुरु असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त

भाईंदर : मिरा रोड व भाईंदर शहरात सध्या सिमेंट रस्ते उभारणी व इतर विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. तर यांचा गंभीर फटका आता बोर्डाच्या परीक्षेला जाणाऱ्या बारावीच्या विद्यार्थांना सहन करावा लागणार आहे.

सविस्तर वाचा..

16:24 (IST) 21 Feb 2024
विरार पोलिसांचे कोंबिग ऑपरेशन, अपहृत मुलीची पोलिसांनी केली सुटका

वसई- विरार पोलिसांनी सुरू केलेल्या कोंबिग ऑपरेशनमध्ये अनपेक्षितपणे गुजरातवरून पळवून आणलेल्या एका मुलीची सुटका करण्यात आली असून घर सोडून पळून आलेल्या तरुणाचाही शोध लागला आहे.

सविस्तर वाचा...

16:05 (IST) 21 Feb 2024
मनोज जरांगेंनी सांगितली आंदोलनाची पुढची दिशा; म्हणाले, "हा तर फक्त ट्रेलर..."

२४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर आपल्या गावात, शहरात रास्तारोको आंदोलन सुरू करायचं. सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन सुरू करून दुपारी एक वाजता संपवायचं आहे. या वेळेत ज्यांना कोणाला जमलं नाही त्यांनी ४ ते ६ वाजेपर्यंत आंदोलन करायचं - मनोज जरांगे

हा ट्रेलर आहे. पिक्चर पुढे सांगायचा आहे. ३ मार्चला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत एकाच ठिकाणी, एकाच वेळी १२ ते १ आंदोलन सुरु झालं पाहिजे. रास्ता रोको सुरू झाला पाहिजे - मनोज जरांगे

15:50 (IST) 21 Feb 2024
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत पनवेल महापालिकेने बाजी मारली

राज्याच्या शिक्षण विभागाने केंद्र स्तरावर, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर ‘सुंदर शाळे’ची स्पर्धा आयोजित केली आहे.

सविस्तर वाचा...

15:47 (IST) 21 Feb 2024
पुणे : लष्करी सरावादरम्यान कोथरुडमध्ये सदनिकेच्या खिडकीवर बंदुकीची गोळी

पुणे : पौड रस्त्यावरील भुसारी कॉलनी परिसरात एका सदनिकेतील गॅलरीची काच फोडून बंदुकीची गोळी शिरल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.

सविस्तर वाचा...

15:45 (IST) 21 Feb 2024
कांद्यावरील निर्यात बंदी कायम ठेवल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी ग्राहक आणि मतदारांना खूश ठेवण्यासाठी कांदाउत्पादक शेतकऱ्यांचा जाणीवपूर्वक बळी दिला जात आहे. असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

सविस्तर वाचा...

15:37 (IST) 21 Feb 2024
जलसंधारण अधिकारी परीक्षेचा पेपर फुटला, विभागाच्या अधिकाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडली!

नागपूर : महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यानुसार विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहे. यासाठी ९ फेब्रुवारी  मृद व जलसंधारण विभागाने परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

सविस्तर वाचा

15:36 (IST) 21 Feb 2024
शालेय विद्यार्थ्यांना सेल्‍फी अपलोड करण्‍याची सक्‍ती ; पालक-शिक्षकांमध्‍ये नाराजी

अमरावती : शाळाबाह्य कामांमुळे आधीच त्रस्‍त असलेल्‍या शिक्षकांसमोर आणखी एक नवीन संकट उभे ठाकले असून 'मुख्‍यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमाअंतर्गत शासकीय आणि खाजगी व्‍यवस्‍थापनाच्‍या शाळांमधील विद्यार्थ्‍यांना येत्‍या २५ फेब्रुवारीपर्यंत मुख्‍यमंत्र्यांच्‍या संदेश पत्रासोबत विद्यार्थी आणि पालकांचा सेल्‍फी संकेतस्‍थळावर अपलोड करण्‍याची सक्‍ती करण्‍यात आल्‍याने शालेय शिक्षण प्रभावित झाल्‍याचा आक्षेप पालक आणि शिक्षकांनी नोंदविला आहे.

सविस्तर वाचा

15:35 (IST) 21 Feb 2024
२५ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पावसाची शक्यता !

नागपूर : वातावरणात सातत्याने होणारा बदलाचा परिणाम ऋतुंवर होत असून बाराही महिने अवकाळी पावसाने राज्यात ठाण मांडले आहे.हिवाळ्यात यावर्षी थंडी जाणवलीच नाही. तर पावसाळ्यात जितका पाऊस झाला नसेल, तितका अवकाळी पाऊस मात्र बाराही महिने पडत आहे.

सविस्तर वाचा

15:35 (IST) 21 Feb 2024
छत्रपतींच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्यशस्त्र म्हणून घोषित; सुधीर मुनगंटीवार यांची आग्रा किल्ल्यावरून घोषणा

चंद्रपूर: ज्या किल्ल्यावरून क्रूर, अत्याचारी, जुलमी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न उधळून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, त्याच आग्रा येथील किल्ल्याच्या दिवाण-ए-खासमधून महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेला दांडपट्टा 'राज्यशस्त्र ' म्हणून घोषित करण्यात आला.

सविस्तर वाचा

15:35 (IST) 21 Feb 2024
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार नव्हे, ‘यांच्या’त होणार लढत, रोहित पवार यांचे मोठे विधान

पिंपरी : अजित पवार यांची भूमिका लोकांना आवडली नाही. बारामती लोकसभा जागेसाठी अजित पवार यांनी उमेदवार ठरविला आहे. पण, अद्याप जाहीर केला नाही, असे रोहित पवार म्हणाले.

सविस्तर वाचा...

15:33 (IST) 21 Feb 2024
नागपूर: भरधाव कारने पाच वर्षीय मुलाला चिरडले

नागपूर : शहरातील रस्ते अपघातांवर वाहतूक पोलिसांना नियंत्रण मिळविण्यावर अपयश येत असल्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे. नवीन घटनेत एका भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या पाच वर्षीय मुलाला धडक दिली. त्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

15:21 (IST) 21 Feb 2024
वसई-विरारमधील २९ गावांचा वाद : गावे समाविष्ट करण्याच्या नव्या निर्णयाला नव्याने आव्हान द्या, विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाची सूचना

मुंबई : वसई-विरार महापालिकेच्या पश्चिम पट्ट्यातील हद्दीतील २९ गावांबाबत राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या अधिसूचनेला नव्याने आव्हान द्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने मंगळवारी निर्णयाला विरोध असलेल्या याचिकाकर्त्यांना केली.

सविस्तर वाचा...

Maharashtra News Live Today 28 August 2023

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

Maharashtra News Live 21 February 2024 :  महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर