Maharashtra Politics Live Updates, 22 September 2025 : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. यातच मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा तापलेला आहे. कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर ओबीसी नेते नाराजी व्यक्त करत आहेत. दुसरीकडे छगन भुजबळांनी शरद पवार यांच्यावरही गंभीर आरोप केल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत.

तसेच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता सरकारने ई केवायसी करणे बंधनकारक केलं असून ई केवायसी केल्यानंतरच या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे. तसेच ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवल्याची माहिती समोर आली असून जालन्यात ही घटना घडली आहे. तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.

Live Updates

Latest Marathi News Live Today : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.

13:08 (IST) 22 Sep 2025

सर्तक वाहतूक पोलीसांमुळे गुटखा वाहतूक उघडकीस

मुंब्रा पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल येथे शनिवारी दुपारी अडीच वाजता वाहतूक पोलीस कर्मचा-यांना एका हलक्या मोटारीचा संशय आल्याने त्याने वाहनाची चौकशी केल्यावर त्यामध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याचे समजले. ...सविस्तर वाचा
13:01 (IST) 22 Sep 2025

Ready Reckoner Rate: अखेर ‘तो’ शासन निर्णय रद्द! शासकीय भूखंडावरील रहिवाशांना दिलासा

शासकीय भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांतील खरेदी-विक्री वा अन बेकायदा व्यवहार नियमाकूल करताना ज्या दिवशी ही प्रकरणे नियमाकूल झाली त्या दिवसापासून रेडी रेकनरचा दर आकारण्यात यावा, असा शासन निर्णय मे २०२५ मध्ये जारी करण्यात आला होता. ...वाचा सविस्तर
12:36 (IST) 22 Sep 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०४७ पर्यंत देशात काय बदल करणार? चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती…

‘गेल्या ७० वर्षांच्या नेहरू-गांधी युगात देशाची अस्मिता रसातळाला गेली होती. आता २०४७ पर्यंत देशाला पुन्हा वैभवाकडे नेण्याचा प्रयत्न आहे. काय करायचे आहे ते मोदी यांना अगदी स्पष्ट आहे,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...सविस्तर बातमी
12:07 (IST) 22 Sep 2025

आता डोंबिवली जवळील २७ गावांमध्ये दुचाकीवरील लुटारूंचा धुडगुस; भोपरमध्ये पादचाऱ्याची सोनसाखळी लुटली

डोंबिवली शहराच्या २७ गाव परिसरात पादचाऱ्यांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा किमती ऐवज हिसकावून पळून जाण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. ...वाचा सविस्तर
12:05 (IST) 22 Sep 2025

Mumbai Police Assault: महिला पोलिसाचे अजब कृत्य; तरुणीवर नेमफ्लेट फेकून मारली, थोडक्यात डोळा वाचला

एका महिला पोलिसाने आपल्या गणवेषावरील नेमप्लेट काढून तरूणीच्या चेह-यावर फेकून मारली. सुदैवाने तिचा डोळा वाचला आहे. ...सविस्तर बातमी
11:37 (IST) 22 Sep 2025

हिंजवडी आयटी पार्क आणि चाकणची वाहतूक कोंडी फुटणार… अजित पवार यांचे नव्याने निर्देश

महामेट्रोकडून हाती घेण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील भक्ती-शक्ती मार्गावरील मेट्रो मार्गिका तळवडेपासून पुढे चाकणच्या एमआयडीसीपर्यंत नेण्यात येणार आहे. चाचपणी करून पर्यायी मार्गांची पाहणी करावी,’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ...सविस्तर बातमी
11:21 (IST) 22 Sep 2025

ठाणे मेट्रोची आज होणार चाचणी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चार स्थानकांपर्यंत चाचणी केली जाणार

मुंबई महानगरातील वाहतुक कोंडी, उपनगरीय रेल्वे मार्गावरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) आणि ४अ (कासारवडवली–गायमुख) प्रकल्प उभारला जात आहे. या मार्गिकेवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चार स्थानकांपर्यंत चाचणी केली जाणार आहे. ही मेट्रो ट्रेन कशी असेल , त्याची वैशिष्ट्य काय आहेत, याविषयी सर्वांमध्ये उत्सुकता असून त्याबाबत जाणून घेऊया.

वाचा सविस्तर

10:58 (IST) 22 Sep 2025

आरसीएफ शाळेबाबत शिक्षण संचालकांचे महत्वाचे निर्देश; शाळा व्यवस्थापनाची जाबाबदारी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि आरसीएफ कंपनीचीच

आरसीएफ शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि आरसीएफ कंपनीचीच असल्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी दिला आहे. ...अधिक वाचा
10:57 (IST) 22 Sep 2025

माथेरान मधील घोड्यांमध्ये डोळ्यांच्या संसर्गाची साथ; पशुसंवर्धन विभागाकडून घोड्यांची तपासणी सुरू

माथेरान मधील घोड्यांना डोळ्यांचा विचित्र आजार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. डोळ्यांना होणाऱ्या या संसर्गामुळे घोड्यांना अंधत्वाचा धोका निर्माण झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ...सविस्तर वाचा
10:56 (IST) 22 Sep 2025

धक्कादायक ! फेसबुकवर मैत्री; मित्राने अमली पदार्थ देऊन मैत्रिणींवर केला बलात्कार, त्याच्या मित्रानेही…

फेसबुकवर दोघांची मैत्री झाली. एके दिवशी घरी सोडून देण्याच्या बहाण्याने मित्राने मैत्रिणीला नशेच्या गोळ्या देत तिच्यावर बलात्कार केला एवढेच नाही तर त्याच्या मित्रानेही तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ...अधिक वाचा
10:56 (IST) 22 Sep 2025

बनावट मतदार नोंदणी : राज्य निवडणूक आयोगाची माहिती देण्यास टाळाटाळ; इलेक्ट्रॉनिक डेटा…

राजुरा विधानसभा मतदार संघात ६ हजार ८६१ बनावट मतदार नोंदणी प्रकरणात राज्याचे मुख्य निवडणूक आयोगाचे अधिकारी पोलीस विभागाला माहिती देण्यास टाळाटाळ करित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...सविस्तर बातमी
10:56 (IST) 22 Sep 2025

बनावट मतदार नोंदणी : राज्य निवडणूक आयोगाची माहिती देण्यास टाळाटाळ; इलेक्ट्रॉनिक डेटा…

राजुरा विधानसभा मतदार संघात ६ हजार ८६१ बनावट मतदार नोंदणी प्रकरणात राज्याचे मुख्य निवडणूक आयोगाचे अधिकारी पोलीस विभागाला माहिती देण्यास टाळाटाळ करित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...सविस्तर बातमी
10:55 (IST) 22 Sep 2025

Viral Video Tadoba : ताडोबात व्याघ्रदर्शनासाठी माणसे रस्त्यावर.., अनुचित घटना घडल्यास काय

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघ कुठेही दिसून येत असल्याने अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...वाचा सविस्तर
10:54 (IST) 22 Sep 2025

निसर्गाचा चमत्कार ! टिपेश्वर अभयारण्यात चक्क तीन शिंगांची नीलगाय

वाघांसाठी ओळखल्या जाणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यात चक्क निलगायीला तीन शिंगे आढळून आल्याने अधिकारी सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. ...सविस्तर वाचा
10:54 (IST) 22 Sep 2025

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण

पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण आणि काँक्रिटीकरण तातडीने हाती घेण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. ...वाचा सविस्तर
10:52 (IST) 22 Sep 2025

पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; येरवडा पोलीस ठाण्यात पत्नीसह सासूविरुद्ध गुन्हा

पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह तिच्या आईविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...वाचा सविस्तर
10:51 (IST) 22 Sep 2025

नवरात्रोत्सवात सराइतांवर कारवाईचा बडगा; परिमंडळ एकमधील ४३ सराइतांची कारागृहात रवानगी

नवरात्रोत्सवात सराइतांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. परिमंडळ एकमधील ४३ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. ...सविस्तर बातमी
10:51 (IST) 22 Sep 2025

पुण्यात पुस्तक संकलन उपक्रम

बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘बीड वाचतंय’ अभियानासाठी पुण्यात पुस्तक संकलन उपक्रम रविवारी राबविण्यात आला ...सविस्तर वाचा
10:51 (IST) 22 Sep 2025

महापालिका निवडणूक कधी होणार? युती होणार का? अजित पवार म्हणाले, 'ज्योतिषी'…

‘आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती की स्वबळावर लढायचे, याचा निर्णय निवडणुका जाहीर झाल्यावर स्थानिक परिस्थिती पाहून वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले. ...सविस्तर वाचा
10:50 (IST) 22 Sep 2025

अल्पवयीन मुले घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले… या ठिकाणी सापडली १४ मुले

रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत कौटुंबिक वादामुळे घरातून पळून आलेल्या १४ अल्पवयीन मुलांना दोन दिवसांध्ये पुणे रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. ...सविस्तर वाचा
10:34 (IST) 22 Sep 2025

Mumbai Monorail: नवीन मोनोरेल गाड्यांच्या अखेर चाचण्या सुरू; जुन्या गाड्याही अत्याधुनिक होणार

मोनोरेलची सेवा काही काळासाठी बंद करून मोनोरेल सुधारणा आराखड्याची अंमलबजावणी करून नवीन अत्याधुनिक मोनोरेल प्रणाली आणि अत्याधुनिक गाड्या सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शनिवारपासून सेवा अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. ...अधिक वाचा
10:34 (IST) 22 Sep 2025

BMC Bribery: दर महिन्याला सात हजार रुपये दे...घरी बसून नोकरी कर! मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्याची लाचखोरी उघड

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील एका सफाई कर्मचाऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ...सविस्तर वाचा
10:33 (IST) 22 Sep 2025

कुंभ मंथनातून छगन भुजबळ, दादा भुसे, माणिक कोकाटे यांना डावलले ? बैठकीवर गिरीश महाजनांचा प्रभाव…

कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. ...सविस्तर बातमी
10:23 (IST) 22 Sep 2025

'अमोल मिटकरींनी सभा घेतल्यामुळे मी जिंकलो, तेच माझे गुरू...', माणिकराव कोकाटे यांचं विधान चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार अमोल मिटकरी यांचं तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे. एका कार्यक्रमात बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, "अमोल मिटकरी निवडणुकीवेळी माझ्या मतदार संघात आले होते. त्यांच्या जोरदार भाषणामुळे मी तीन हजार मतांनी निवडून आलो. तसं मिटकरी माझे गुरू आहेत. बोलायला लागले की ते कोणाचीही हायगय करत नाहीत.", असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

10:23 (IST) 22 Sep 2025

“पैशांशिवाय आंदोलनं होतात का?” वडेट्टीवारांकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण; व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत म्हणाले…

Vijay Wadettiwar Remark on Laxman Hake’s Viral Call Recording : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने हाके यांना त्यांच्या सामाजिक कार्यात योगदान म्हणून पैसे देऊ केले. लक्ष्मण हाके यांनी देखील ते पैसे स्वीकारण्यास सहमती दर्शवली. ते म्हणाले. “मी बँक खात्यावर पैस घेत नाही. मुळात माझ्याकडे बँक खातं नाही. मी यूपीआय वापरत नाही. तसेच हाके यांनी पैसे देऊ करणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार चालकाचा यूपीआय लिंक्ड फोन नंबर देऊ केला आणि त्या नंबरवर पैसे पाठवण्यास सुचवलं. यावर तरुणाने हाके यांना शिवीगाळ केली.

सविस्तर वाचा

Maharashtra Politics Updates

“पैशांशिवाय आंदोलनं होतात का?” वडेट्टीवारांकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण; व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत म्हणाले…, (फोटो-संग्रहित छायाचित्र)