Maharashtra Maratha Reservation Protest Live Updates: राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये वरुणराजाचीही उपस्थिती पाहायला मिळत आहे. काही भागांना पावसाने झोडपल्याचे चित्र आहे.
याचबरोबर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत. ते नुकतेच मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना मर्यादित लोकांसह उपोषणाला परवानगी दिली आहे. असे असले तरी जरांगे पाटील यांच्याबरोबर मराठा समाजाचे लाखो लोक मुंबईत प्रवेश केला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत एवढे लोक मुंबईत आल्याने त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई पोलिसांची कसोटी लागणार आहे.
यासह राज्यातील विविध घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Mumbai Breaking News Update : राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Ajit Pawar : मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय? अजित पवारांनी दिलं उत्तर; मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत म्हणाले…
हजारोंच्या संख्येने मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचं चौपाटी, मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटन
निघोजे बंधारा लवकच गाळमुक्त; यांत्रिकी पद्धतीने गाळ काढण्याचा पिंपरी महापालिकेचा निर्णय
एसटी बसची समोरासमोर धडक; १२ प्रवासी जखमी; मुळशीतील कोलाड रस्त्यावर अपघात
समाजमाध्यमावर पिस्तूल घेतलेली चित्रफीत प्रसारित; तरुणाला अटक
Manoj Jarange Mumbai Morcha Live: मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावे : खासदार बळवंत वानखडे
मनोज जरांगे यांच्या आदोनलावर बोलताना काँग्रेस खासदार बळवंत वानखडे म्हणाले की, "येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दडपले जाईल. दुसऱ्याे आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण नको मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. केंद्र सरकारने आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता विशेष अधिवेशन घेतले पाहिजे व मराठ्यांचा प्रश्न निकाली काढला पाहिजे.
'आंदोलनावर पोळी भाजणाऱ्यांचं तोंड भाजेल', मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना इशारा; मराठा आंदोलनावर मोठं विधान
जरांगेंच्या आंदोलनावर शरद पवार गप्प का ?, या चुप्पीचा अर्थ महाराष्ट्र समजतो, भाजपच्या आरोपाने…
ब्रेकअप झाल्याने प्रेयसीवर पिस्तुलातून गोळीबार; बाणेरमधील घटना; गाेळीबारात युवती बचावली
Eknath Shinde : कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करुन मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यंदापासून खेळाडूंना शिष्यवृत्ती आणि विमा संरक्षण; हरभजन सिंगच्या उपस्थितीत खासदार क्रीडा संग्रामच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा
Manoj Jarange Mumbai Morcha Live: शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे मनोज जरांगेंच्या भेटीला
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील आज आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.
Manoj Jarange Mumbai Morcha Live: सरकारने मनोज जरांगे यांच्याशी तात्काळ संवाद साधावा : उद्धव ठाकरे
शिवसेना (उद्धव ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी म्हटले की, "सरकारने मराठा आरक्षणसाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्याशी तात्काळ संवाद साधावा आणि समाजाला न्याय द्यावा.
डोंबिवली, कल्याणमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमामध्ये ५२८८ शाडूच्या गणेशमूर्तींचे संकलन
मुंबई-ठाण्याच्या वेशीवर मराठा आंदोलकांची जेवण, वडापावची सोय
मराठा मोर्चा : अवजड वाहनांच्या भारामुळे मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण ठप्प, आमदार बालाजी किणीकर देखील अडकले कोंडीत
शिवरायांच्या किल्ल्यांचे देखावे, डोंबिवलीतील टिळकनगर मंडळाची युनेस्कोच्या गौरवाला मानवंदना
कल्याणमध्ये नवजात बालकाला कचराकुंडीत फेकणाऱ्या इसमला अटक; अनैतिक संबंधातून अल्पवयीन तरूणी राहिली गर्भवती
Manoj Jarange Mumbai Morcha Live: आझाद मैदानावर जरांगेंची भेट घेणारे आमदार आणि खासदार
Ganeshotsav2025 : ठाण्यातील या शाळेचा पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी हातभार
Manoj Jarange Mumbai Morcha Live: मनोज जरांगे यांच्या भेटीला खासदार बजरंग सोनवणे
आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आज उपोषण सुरू केले आहे. दरम्यान आतापर्यंत अनेक आमदारांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. आता खासदार बजरंग सोनवणे यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
Manoj Jarange Mumbai Morcha Live: मराठा समाजाच्या आंदोलनबाबत ठोस निर्णय घ्यावाच लागेल: माजी खासदार विनायक राऊत
मनोज जरांगे यांचे उपोषण आणि मराठा आरक्षणावर बोलताना, ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले की, "आज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. हे पाहिल्यावर सध्याच्या राजकारण्यांना मराठा समाजाच्या आंदोलनबाबत थातुर मातुर उपाय काढून चालणार नाही. यावर ठोस निर्णय घ्यावाच लागेल. आरक्षणाबाबत मर्यादा वाढविण्याबाबतची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करावी. जरांगे पाटील यांना या आंदोलनाद्वारे यश नक्कीच मिळेल, ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यातील मराठा समाज जरांगे यांच्या बरोबर आहे."
कल्याण-डोंबिवलीत पर्यावरण नियमांना धक्का देत झाडांवर नियमबाह्य विद्युत रोषणाई
डोंबिवलीत अति धोकादायक इमारत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही
जुन्या गडकरी रंगायतनचा इतिहास जागे होतो तेव्हा….
पैसे असतील तर दुप्पट, सोने अडीच पट.. केंद्र संचालकाला टोळीने कसा घातला गंडा ?
नाशिकमधील सर्वाधिक मौल्यवान गणेश मूर्ती कोणत्या मंडळाकडे ?
चाकण मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनधिकृत बांधकामांवर आता कारवाई; पीएमआरडीए प्रशासनाचा निर्णय
‘यशवंत’च्या जमिन विक्रीत पाचशे कोटींचे नुकसान
साहिल पारख कोण ?…नाशिकपासून ऑस्ट्रेलियापर्यंत चर्चेत राहण्याचे कारण…
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत. ते नुकतेच मुंबईत दाखल झाले आहेत.