Marathi News Live Today : राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं असून या संदर्भात राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. यावरही विरोधकांनी प्रतिक्रिया देत बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे भाजपाने हा निर्णय घेतल्याची टीका करण्यात येत आहे.
दरम्यान, पुण्यातील परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांनी नवीन इमारतीचं उद्घाटन भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी या येण्याच्या आधीच केलं. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी अजित पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा इमारतीचं उद्घाटन केलं. या घडामोडीमुळे महायुतीतील नाराजी नाट्य समोर आलं आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Mumbai-Pune News Live Today 1 May 2025 : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
मुंबईत घरे देण्यासाठी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे; संयुक्त बैठकीचे आशिष शेलार यांचे गिरणी कामगार एकजुटीला आश्वासन
विकास कामांच्या जोरावर जळगाव जिल्ह्याचा प्रवास उत्कर्षाच्या वाटेवर– पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विश्वास
ठाणे जिल्हा परिषद राज्यात सरस; कार्यालय मूल्यमापनमध्ये १०० पैकी ९२ गुण प्राप्त
समृद्धीचा १ मेचा मुहूर्तही हुकला; लोकार्पण लांबल्याने प्रवाशांत नाराजी, नवी तारखी गुलदस्त्यात
जळगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक अखेर निलंबित
WAVES 2025 Summit : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेली 'वेव्हज् परिषद' नेमकं काय आहे? जाणून घ्या!
उन्हाळी शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जाण; वनशक्ती व वनविभागाचा पर्यावरणपूरक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाण्यात दोन वृक्ष उन्मळून पडले; वृक्ष पडून कारचे नुकसान, वृक्ष बाजूला करताना अग्निशमन जवान जखमी
“…तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते”, शहाजीबापू पाटलांचं वक्तव्य
“२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असते” असे वक्तव्य शिवसेनेचे (शिंदे) नेते व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. “मागच्या वेळेस मी निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे अडीच वर्षे आणि एकनाथ शिंदे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले होते”, असेही पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.
नातेवाईकच ठरले वैरी; दोन खुनाच्या घटनांनी यवतमाळ हादरले…
"...म्हणून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं", मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान
"मी याआधी देखील सांगितलं की राजकारणातील मतभेद, मग तत्वाचे किंवा विचाराचे मतभेद असू शकतात. त्यामुळे कोणी एकत्र येत असेल तर काहीही हरकत नाही. आता राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याचा विचार केला तर त्यांना एक परंपरा आहे.त्यांच्या आजोबांपासूनची ती परंपरा आहे. पुरोगामी विचारांचं महत्वाचं व्यक्तीमत्व म्हणून त्यांचे आजोबा होते. शेवटी जर जनतेच्या हितासाठी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे एकत्र येत असतील आनंद आहे. पण ते पुरोगामी विचारांना आणि लोकशाहीला जपण्यासाठी एकत्र यावेत अशी अपेक्षा आहे", असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
कल्याण डोंबिवलीत जीव धोक्यात घालून मजुरांकडून गटार सफाईची कामे; गटार सफाई मजूर मिळत नसल्याने कसारा, खर्डी भागातील तरूणांना मागणी
निकोबार बेटावर वेळेआधीच मोसमी पाऊस येणार…
अखेर तीन वर्षानंतर महापालिकेच्या नाट्यगृहात मराठी व्यावसायिक नाटकाची पर्वणी, नाट्यरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण
"जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा सरकारने घेतला असला तरी यांचं श्रेय फक्त राहुल गांधी यांना जात आहे. राहुल गांधी यांनी सातत्याने जातनिहाय जनगणनेचा विषय लावून धरला. राहुल गांधी यांनी घेतलेल्या या भूमिकेपुढे केंद्र सरकारला शेवटी गुडघे टेकावे लागले", अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकार केली आहे.
Mahayuti Report Card : महायुती सरकारचं १०० दिवसांचं रिपोर्ट कार्ड जाहीर, कोणत्या मंत्र्यांचा विभाग कितव्या क्रमांकावर? वाचा यादी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर
भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत.
महायुतीत नाराजीनाट्य? खासदार मेधा कुलकर्णी यांच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा उद्घाटन
पुण्यातील परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांनी नवीन इमारतीचं उद्घाटन भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी या येण्याच्या आधीच केलं. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी अजित पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा इमारतीचं उद्घाटन केलं. या घडामोडीमुळे महायुतीतील नाराजी नाट्य समोर आलं आहे.
“राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ”, पंतप्रधान मोदींनी मराठीत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र बजावत आहे. तसेच राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsभारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी…
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2025
पंतप्रधान मोदींनी मराठीत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, (फोटो-संग्रहित छायाचित्र)