पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी एका भीषण अपघतात दोन तरुणांचा जीव गेला. या अपघाताला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलाला तत्काळ जामीनही मिळाला होता. यावरून पुणेकरांनी संताप व्यक्त केला. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांवर टीका होऊ लागली. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे राजकीय नेत्यांनीही यात आता हस्तक्षेप केला आहे. पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. दरम्यान, दुसरीकडे राज्यातील मतदानाचे टप्पे पार पडले असले तरीही आता सर्वांची नजर ४ जूनकडे आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.

Live Updates

Marathi News Updates 22 May 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

20:55 (IST) 22 May 2024
मुंबई : अग्निशमन दलातील जवान चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित

मुंबई : गेल्या वर्षी अग्निशमन दलाच्या भरतीत निवड होऊन कामावर रुजू झालेले अग्निशमन दलातील ४५९ जवान गेल्या चार महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. कामावर हजर होऊनही वेतनापासून वंचित राहावे लागत असल्याने संबंधित अग्निशामकांची आर्थिक घडी विस्कटली आहे.

वाचा सविस्तर...

20:34 (IST) 22 May 2024
मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत ४३२० कोटी जमा, कर भरण्यासाठी केवळ तीन दिवस

मुंबई : मुंबई महानगरपालिकेला यंदा ४३२० कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात अखेर यश आले आहे. यंदा मालमत्ता कर भरण्यासाठी २५ मेची मुदत देण्यात आली असून मालमत्ता कर भरण्यासाठी केवळ तीन दिवस उरले आहेत.

वाचा सविस्तर...

19:05 (IST) 22 May 2024
तीस हजार लाचेची मागणी; नगर रचनाकारासह तिघे सापळ्यात

छत्रपती संभाजीनगर : जमिनीचा अकृषिक परवाना काढून देण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये घेताना एका खासगी व्यक्तीला पकडण्यात आले असून त्याने बीडमधील सहायक नगररचनाकारासाठी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

वाचा सविस्तर...

18:27 (IST) 22 May 2024
कापूरबावडी उड्डाणपूलावर वाहन उलटले, कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावर बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ठाण्याहून मुंबईच्या दिशने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर सिमेंट मिक्सर वाहन उलटले. या वाहनातील तेल रस्त्यावर सांडल्याने पूलावर वाहतुक कोंडी झाली आहे.

वाचा सविस्तर...

17:51 (IST) 22 May 2024
"सोपी निवडणूक म्हणता म्हणता...", पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत; म्हणाल्या, "मनता द्वेष आणि पोटात विष ठेवून..."

निकाल ४ तारखेला आहे. ज्या सकारात्मकतेने, निर्भिडतेने साथ दिली ती महत्त्वाची आहे. निर्भिडता निष्क्रियतेपेक्षा कधीही भारी ठरते. निर्भिडपणे, निस्सिमपणे खूप लोकांनी साथ दिली. मी केव्हाही पूजा करते तेव्हा मी नेहमी देवाचे आभार मानते. निवडणूक साधी साधी म्हणता म्हणता या निवडणुकीने वेगळाच रंग घेतला. राज्यातील निवडणुकीने रंग घेतला. आता सर्वजण शांत बसले आहेत. लढाई विचारांची असावी. कोणत्याही व्यक्तीचा कायमचा तिरस्कार वाटू नये. अशा भावनेची माझी जडण-घडण आहे. मी सत्तेच्या पदावर काम करत असताना गोष्टींचं भान पाळलं आहे. मी कधीही माझ्या मनातील करुणा कमी होऊ दिली नाही. मी कधीही अन्याय होऊ दिला नाही. मी कधीही मनात द्वेष ठेवून, पोटात विष ठेवून मी व्यवहार केला नाही. याचं मला समाधन वाटतं. द्वेषविरहित, मुद्द्यांना धरून राजकारण करणं हे सोपं नाही. हे शिवधनुष्य झेलण्याचा मी प्रयत्न करतेय. माझी प्रकृती खालावली होती. परंतु, आजची पूजा इतकी सुंदर झालीय, तुमच्याशी शेअर करावी वाटली - पंकजा मुंडे</p>

17:01 (IST) 22 May 2024
आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

17:01 (IST) 22 May 2024
पनवेल: सरकारी पोस्ट कार्यालयाबाहेर छप्पर टाकण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

सरकारी काम आणि बारा महिने थांब या उक्तीप्रमाणे पोस्ट विभागाचा कारभार सूरु असल्याने नागरिकांची मागणी बासनात पडून होती.

सविस्तर वाचा...

16:46 (IST) 22 May 2024
नागपूर, वर्धेत स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवणे सुरू; ग्राहकांच्या मनस्तापाचे…

महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सर्वच राज्यांच्या वीजग्राहकांकडे स्मार्ट प्रिपेड मीटर लावणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्यातील २.४१ कोटी ग्राहकांकडे हे मीटर लागणार आहे.

सविस्तर वाचा...

16:26 (IST) 22 May 2024
नाशिक : मुंढेगावातील विहिरीत मायलेकीचे मृतदेह

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळा परिसरातील विहिरीत २३ वर्षाची विवाहिता आणि तिच्या तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. प्रियंका दराणे (२३) आणि वेदश्री दराणे (तीन) असे या माय-लेकीचे नाव आहे. सविस्तर वाचा…

16:24 (IST) 22 May 2024
भाईंदर : बारावीत ७८% मिळवूनही विद्यार्थिनीची आत्महत्या; ९० टक्के न मिळाल्याने होती निराश

बारावीच्या निकालात ९० टक्के न मिळाल्याने एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे. तिला ७८% मिळाल्याने ती निराश होती. अनुष्का मेहरबानसिंह कबचुरी(१७)असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. सविस्तर वाचा…

16:23 (IST) 22 May 2024
मोहोळजवळ जुगार अड्डा उद्ध्वस्त; एक कोटीचा मुद्देमाल जप्त; सुरत, रत्नागिरीतून आलेले व्यापारी सापडले

मोहोळ तालुक्यातील अनगर येथे एका दुमजली जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून ३८ जणांना पकडले. या कारवाईत रोख रकमेसह महागड्या मोटारी आणि किंमती स्मार्टफोन असा मिळून एक कोटी ३ लाख ६९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सविस्तर वाचा…

16:21 (IST) 22 May 2024
चिपळे ते वावंजे रस्ता रुंदीकरणाअभावी अपघातांचे सत्र सूरुच; दोन अपघातांमध्ये एक महिलेचा मृत्यू तर तीघे जखमी

पनवेल तालुक्यातील ग्रामीण परिसरामध्ये नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना प्राधिकरण जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात वाहनांची येजा करण्यासाठी रुंद रस्ते नसल्याने अपघातांचे सत्र सूरुच आहे. सविस्तर वाचा…

15:29 (IST) 22 May 2024
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प: पैसे भरा आणि मगच मचाणवर बसा, पण जेवण मिळणार नाही !

जंगल आणि वन्यप्राण्यांबाबत लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने बुद्धपौर्णिमेच्या दिवशी मचाण उपक्रम सुरू करण्यात आला.

सविस्तर वाचा...

15:29 (IST) 22 May 2024

पुणे सत्र न्यायालयात अपघातप्रकरणी सुनावणी सुरू

15:18 (IST) 22 May 2024
पुणे अपघातप्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळांचं प्रत्युत्तर, म्हणाले "खोटे नॅरेटिव्ह..."

लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच ! कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो. मंगळवारीही उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत. - मुरलीधर मोहोळ

14:56 (IST) 22 May 2024
नाशिक: वणी स्थानकात एसटी बसच्या इंजिनने घेतला पेट, प्रवासी सुखरूप

वणी स्थानकात सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिकहुन कळवणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची पिंपळगाव आगाराची जादा बस उभी होती.

सविस्तर वाचा...

14:43 (IST) 22 May 2024
शासनाच्या डोळ्यात धुळफेक! शेती नसलेल्यांनाही मिळाले धानाच्या बोनसचे पैसे; ६ लाख रुपयांचा घोटाळा

बोगस शेतकरी दाखवून बोनसची रक्कम उचल करण्यात आली तसेच बोगस सातबारा तयार करुन शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा...

14:33 (IST) 22 May 2024
विदर्भात मोसमी पाऊस केव्‍हा दाखल होणार? हवामान तज्‍ज्ञांनी सांगितले…

मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा...

13:25 (IST) 22 May 2024
"राहुल गांधींनी मतांचं राजकारण करू नये", पुणे अपघातप्रकरणी फडणवीसांची टीका

या घटनेचे राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे, कारण पुण्यातील घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयावरही आम्ही आश्चर्य व्यक्त केले आहे, मात्र पोलिसांनी त्याविरोधात अपील दाखल केले आहे...अल्पवयीन मुलाला दारू पाजणाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे, तसेच गाडी देणाऱ्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. राहुल गांधींनी प्रत्येक गोष्टीत मतांचे राजकारण आणण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे...मी त्याचा निषेध करतो - देवेंद्र फडणवीस

https://x.com/ANI/status/1793183421637992586

11:48 (IST) 22 May 2024
भाजपच्या प्रभाव क्षेत्रात मतदान कमी कसे झाले? नाशिक लोकसभेसाठी ६०.७५ टक्के मतदान

नाशिक लोकसभा मतदारसंघात ६०.७५ टक्के मतदान झाले असून शहरातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत ग्रामीणमधील तीन विधानसभा मतदारसंघात अधिक मतदान झाले.

सविस्तर वाचा...

11:37 (IST) 22 May 2024
दिंडोरी मतदारसंघात मतांचा पाऊस, ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे उत्स्फुर्तता

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जसे उत्स्फुर्तपणे मतदान होते, तसेच चित्र कांदा प्रश्नामुळे गाजलेल्या दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतदानात ग्रामीण भागात दिसले.

सविस्तर वाचा...

11:06 (IST) 22 May 2024
‘हर घर नल, हर घर जल’ची प्रतीक्षाच! जलजीवन योजनेवर १९८ कोटी खर्च

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापुर्ण व शुध्द पाणी देण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन योजना सुरु केली.

सविस्तर वाचा...

11:06 (IST) 22 May 2024
धक्कादायक! आरटीईचे समांतर कार्यालय सीताबर्डीत! लाखो रुपयांची खासगी कार्यालयातून उलाढाल

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) अंतर्गत मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या १७ पालकांवर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

सविस्तर वाचा...

11:05 (IST) 22 May 2024
नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांना देणार हिंदू धर्म, संस्कृती, हिंदू साहित्याचे धडे; असा निर्णय का घेतला जाणून घ्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना आता भारतीय ज्ञान परंपरेचे संशोधन तसेच विस्तृत ज्ञान प्राप्त करणे शक्य होणार आहे.

सविस्तर वाचा...

11:04 (IST) 22 May 2024
सावधान! ‘या’ राज्यांमध्ये बनावट कागदपत्रांवर चोरीच्या वाहनांची नोंदणी, चेसिससह इंजिन क्रमांक…

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये बनावट कागदपत्रांवरून चोरीच्या वाहनांची नोंदणी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

सविस्तर वाचा...

10:47 (IST) 22 May 2024
“पुण्यातील बिल्डर लॉबीला फडणवीसांचा पाठिंबा”, पोर्श अपघातप्रकरणी धंगेकरांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. बिल्डर लॉबी त्यांच्यावर दबाव टाकू शकते. हा सगळा फार्स असू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे पुणेकरांचं समाधान करण्याकरता ते आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला. पुणेकरांना दाखवणारा देखावा आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्या रात्री बरीच माया जमा केली आहे. पोलिसांनी चुकीचा तपास केला. पुणे पोलिसांनी पैसे घेतले आणि एवढे पैसे घेतल्याशिवाय व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही. विशाल अग्रवाल हा बिल्डर डीफॉल्टर आहे. प्रचंड प्रमाणात पुणे महापालिकेत या बिल्डरकडून पैसे येणे आहेत. विशाल अग्रवालसह अनेक बिल्डर भाजपाबरोबर काम करतात. ते चुकीचं काम करतात म्हणून ते भाजपाबरोबर संलग्न आहेत. या लॉबीला देवेंद्र फडणवीस पाठिशी घालतात - रवींद्र धंगेकर

DCM Devendra Fadnavis Big statement

देवेंद्र फडणवीस, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Marathi News Updates 22 May 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा