Mumbai Maharashtra News Today : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. देशभरातील लोकसभेच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवातदेखील केली आहे. कही ठिकाणी युती आणि आघाड्यांमध्ये जागावाटपावर अंतिम चर्चा चालू आहेत, तर काही पक्ष उमेदवारांच्या घोषणा करू लागले आहेत, जागावाटपांचे निर्णय जाहीर करत आहेत, अशा सर्व राजकीय बातम्यांच्या आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. लोकसभेसाठी पहिल्या टप्यात १९ मे रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामधील विदर्भातील जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे.

Varsha Gaikawad Congress
Maharashtra News : उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर, भाजपाकडून मात्र..
Maharashtra Lok Sabha Election 2024
Maharashtra News : सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन
Mumbai Maharashtra News in Marathi
Maharashtra News “इंडि आघाडी म्हणजे कमिशन मिळवणारी, सत्तालोलुप आघाडी”, मोदींची घणाघाती टीका
VBA Candidate List
Maharashtra News : वसंत मोरेंचा वंचितमध्ये प्रवेश
Live Updates

Maharashtra News Updates 29 March 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

18:21 (IST) 29 Mar 2024
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध

पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. गेल्या काही दिवसांतील हा तिसरा बदल असून, सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

17:59 (IST) 29 Mar 2024
कामा रुग्णालयामध्ये सुरू होणार नऊ नवे विभाग; मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई व रायगडमधील रुग्णांना दिलासा मिळणार

मुंबई : जी. टी. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कामा रुग्णालय संलग्नित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार कामा रुग्णालयामध्ये लवकरच नऊ नवीन विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:35 (IST) 29 Mar 2024
रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोकल सेवा विलंबाने धावतील.

सविस्तर वाचा...

17:03 (IST) 29 Mar 2024
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल

लोणावळा : गुड फ्रायडेला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी कोंडी झाली. घाट क्षेत्रात वाहतूक संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा आणि बोरघाट महामार्ग पोलिसांनी प्रयत्न केले.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 29 Mar 2024
भाजपच्या ‘लेटरहेड’वर मुख्यमंत्र्याचे आदेश, उच्च न्यायालय म्हणाले, बेकायदेशीर…

नागपूर : अमरावती महापालिकेच्या अंतर्गत एका बांधकामाला स्थगिती आणण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र हे आदेश भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या तथाकथित लेटरहेडवर हस्तलिखित स्वरुपात आदेश दिले होते. अशाप्रकारे राजकीय पक्षाच्या लेटरहेडवर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली.

वाचा सविस्तर...

16:40 (IST) 29 Mar 2024
शुल्कमाफीनंतर अंबानी रुग्णालयाला भूखंड ? अंधेरीतील अडीच एकरच्या भूखंडावरील आरक्षण हटवण्याच्या हालचाली

मुंबई : महागड्या उपचारासाठी परिचित असलेल्या अंधेरीतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाने परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या नावाखाली शेजारी असलेला सुमारे अडीच एकर (१० हजार २८६ चौरस मीटर) भूखंड राज्य शासनाकडे मागितला आहे.

सविस्तर वाचा...

15:36 (IST) 29 Mar 2024
‘गोविंदाचे स्वागत अन् मला नाटक्या, नौटंकी…’, डॉ. अमोल कोल्हेंचे शिवाजीराव आढळराव पाटलांना प्रत्युत्तर, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

पिंपरी : हिंदी सिनेसृष्टीतीला अभिनेता गोविंदा शिवसेनेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत करत कलाकार हा कलाकार असतो. त्याचा अपमान करणाऱ्याला जनता धडा शिकवेल, असे म्हटले होते.

सविस्तर वाचा...

15:35 (IST) 29 Mar 2024
होळीच्या दिवशी रस्त्यावर फुगे मारणारी हुल्लडबाज मुले ताब्यात; पोलिसांकडून पालकांवर गुन्हे

पुणे : होळीच्या दिवशी फर्ग्युसन रस्त्यावर पादचारी नागरिक आणि तरुणींना पाण्याचे फुगे मारून हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली होती. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई करुन हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांना पकडले.

सविस्तर वाचा...

15:34 (IST) 29 Mar 2024
जागा हस्तांतरणाला होणाऱ्या विलंबावरून उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारची कानउघाडणी

मुंबई : वांद्रे येथील उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या जागेचा ताबा देण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत हे वारंवार आदेश देऊनही राज्य सरकार स्पष्ट करत नसल्याने उच्च न्यायालयाने गुरुवारी संताप व्यक्त केला.

सविस्तर वाचा...

15:33 (IST) 29 Mar 2024
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे नाराज; अजित पवारांची साथ सोडणार?

पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अधिकृत उमेदवारी दिल्याने नाराज झालेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यातच अनेकांना शरद पवार गटात आणण्यासाठी प्रयत्न करणारे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही सूचक विधान केले आहे.

सविस्तर वाचा...

15:32 (IST) 29 Mar 2024
मालमत्ता करवसुलीसाठी मुंबई महानगरपालिकेकडे केवळ तीन दिवस शिल्लक, करवसुलीत २१०० कोटींची तूट

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाने मालमत्ता करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र असे असले तरी करवसुलीमध्ये सुमारे २१०० कोटी रुपयांची तूट आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असून मुंबई महानगरपालिकेला या तीन दिवसांत ४५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठावे लागणार आहे.

सविस्तर वाचा...

15:30 (IST) 29 Mar 2024
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

पुणे : दांडेकर पूल भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा मुलावर दहा ते बारा जणाच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्राना मारहाण करण्यास आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

15:28 (IST) 29 Mar 2024
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा बहुप्रतिक्षित मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी – मरिन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेवरून गेल्या १२ दिवसांमध्ये तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला.

सविस्तर वाचा...

14:51 (IST) 29 Mar 2024
पुण्यातील रेल्वे प्रवाशाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा फटका टोळीचा गुंड अटकेत, प्रवाशाच्या हातावर मारला होता फटका

होळीसाठी तो मुंबईत घरी आला होता. दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यासाठी तो इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास करत होता.

सविस्तर वाचा...

14:23 (IST) 29 Mar 2024
शिवजयंतीला गालबोट, मिरवणुकीवर दगडफेक; नांदुऱ्यात अटकसत्र सुरू

बुलढाणा : तिथीनुसार साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीला नांदुरा येथे गालबोट लागले. मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याने किमान ६ जण जखमी झाले. काल मध्यरात्रीनंतर गुन्हे दाखल केल्यावर आज शुक्रवारी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे.

वाचा सविस्तर...

14:22 (IST) 29 Mar 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

गोंदिया : राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांना विमान घोटाळा प्रकरणी सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना दिलासा मिळाला आहे. सीबीआयने दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात या याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल पटेल यांना टोला लावला असून ते वाशिंग मशीन मध्ये गेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे जे व्हायचं ते होणारच होतं असं म्हटलं आहे.

वाचा सविस्तर...

14:21 (IST) 29 Mar 2024
सुधारित मतदार यादीची प्रतीक्षाच, लोकसभेनंतरच अधिसभा निवडणुकीची शक्यता

मुंबई : निवडणुकीला रातोरात स्थगिती, राजकीय आरोप – प्रत्यारोप आणि न्यायालयातील लढाई आदी विविध कारणांमुळे मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक सुरुवातीपासूनच रखडली आहे. या पार्श्वभूमीवर एका महिन्यानंतरही नोंदणीकृत पदवीधरांची सुधारित मतदार यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

वाचा सविस्तर...

13:30 (IST) 29 Mar 2024
धुळे शहरात हलका पाऊस

शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण, ढगांचा गडगडाट आणि हलक्याशा पावसाचा शिडकाव झाल्याने वातावरण पूर्णपणे पालटले.

सविस्तर वाचा...

13:23 (IST) 29 Mar 2024
भरदिवसा जुहू चौपाटीवर बलात्कार करणे अविश्वनीय, आरोपीला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

पीडित मुलगी अल्पवयीन असून ओशिवरा येथे घरकाम करत होती. त्यावेळी तिची सुरक्षा रक्षक म्हणून करणाऱ्या याचिकाकर्त्याशी ओळख झाली.

सविस्तर वाचा...

13:21 (IST) 29 Mar 2024
भावना गवळींचे राजकीय भवितव्य अधांतरीच! मुख्यमंत्र्यांची ‘कामाला लागा’ सूचना वल्गना ठरणार?

यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण, हा गुंता अधिकच वाढला आहे. शिवसेना (शिंदे) गटाने गुरूवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत यवतमाळ-वाशीमच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे बुधवारी भावना गवळी यांच्या समर्थकांना मुख्यमंत्र्यांनी ‘कामाला लागा’ अशा सूचना केल्या होत्या, या सूचना वल्गना तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.

वाचा सविस्तर...

12:57 (IST) 29 Mar 2024
भारतातील फुलपाखरांवर सचित्र मार्गदर्शक पुस्तक, भारतीय प्राणिशास्त्र विभागाचा उपक्रम

मुंबई : निसर्गाचे अस्तित्व टिकवणारे, विविध रंगांनी समृद्ध असलेल्या फुलपाखरांचे जतन करणे आवश्यक आहे. यासाठीच केंद्रीय पर्यावरण, वन तथा जलवायू परिवर्तन मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण विभागाने भारतातील फुलपाखरे- वर्गीकरण प्रक्रिया, कौटुंबिक वर्ण, विविधता आणि वितरण या नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.

पुस्तकाचे लेखन भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या संचालक, डॉ. धृती बॅनर्जी आणि भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेमधील शास्त्रज्ञ डॉ. नवनीत सिंग, डॉ. राहुल जोशी आणि डॉ.पी.सी.पठानिया आणि हाँगकाँगमधील लेपिडोप्टेरा तज्ज्ञ डॉ. आर,सी.केंड्रिक यांनी केले आहे. दरम्यान, पॉल वारिंग (यूके), मार्क स्टर्लिंग(एनएचएम,यूके), गौरव नंदी दास आणि मार्टिन कोनविका (युनिव्हर्सिटी ऑफ साउथ बोहेमिया, झेक रिपब्लिक) यांनी लिहिलेले तीन लेख वाचकांना लेपिडोप्टेरोलॉजीमधील विविध तंत्रांची माहिती देण्यासाठी समर्पित आहेत. भारतातील सचित्र मार्गदर्शन करणारे अशा प्रकारचे हे पहिले पुस्तक आहे. ज्यामध्ये जागतिक खवलेपंखीच्या ३२० प्रजाती, १४३ प्रजाती गटांची नोंद आहे.

12:57 (IST) 29 Mar 2024
ॲड. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पाठिंबा देणार? माजी आमदार म्हणतात, “धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी…”

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस सध्या तळ्यात-मळ्यातच्या भूमिकेत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात ठिकाणी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवून दोन ठिकाणी समर्थन जाहीर देखील केले. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकरांविरोधात अकोल्यात उमेदवार द्यावा का? यावरून काँग्रेसमध्ये खल सुरू आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस अंतर्गत दबाव वाढत आहे.

वाचा सविस्तर...

12:56 (IST) 29 Mar 2024
यवतमाळ वाशीम लोकसभेचा तिढा सुटता सुटेना; शिंदे गटाच्या पहिल्या यादीत भावना गवळी यांचे नाव नसल्याने…

वाशीम : शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार म्हणून खासदार भावना गवळी यांचे नाव जाहीर करावे, यासाठी गवळी समर्थकांनी मुंबईवारी केली. तरीही खासदार भावना गवळी यांचे नाव जाहीर न झाल्याने उमेदवारीचा तिढा कायम आहे.

वाचा सविस्तर...

12:55 (IST) 29 Mar 2024
मध्य रेल्वेवर धावणार शिक्षक विशेष रेल्वेगाडी

मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी आणि शिक्षकांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी दादर - गोरखपूरदरम्यान शिक्षकांसाठी दोन पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक ०११०१ शिक्षक विशेष दादर येथून २ मे रोजी दुपारी २.०५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री २.४५ वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०२ शिक्षक विशेष गोरखपूर येथून १० जून रोजी दुपारी २.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ३.३० वाजता दादर येथे पोहोचेल.

शिक्षकांच्या विशेष रेल्वेगाडीचे आरक्षण विशेष शुल्कासह ३१ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता सीएसएमटी येथील विशेष आरक्षण केंद्रामधून होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

12:38 (IST) 29 Mar 2024
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

पुणे : दांडेकर पूल भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा मुलावर दहा ते बारा जणाच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्राना मारहाण करण्यास आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

12:37 (IST) 29 Mar 2024
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार

मुंबई : संबंधित यंत्रणेने महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यांतर्गत (मोक्का) खटला चालवण्यास नकार दिल्यास त्याच दिवशी तपास पूर्ण करण्यासाठी मिळालेला अतिरिक्त कालावधी संपुष्टात येतो आणि आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामिनाची मागणी करण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

सविस्तर वाचा...

12:36 (IST) 29 Mar 2024
वीजसंकट टळले! कोराडीतील ‘या’ संचातून वीजनिर्मिती सुरू

नागपूर : विदर्भासह राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच महावितरणच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील ६६० मेगावॅटचा एक संच बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद पडला होता. हा संच आता सुरू झाल्याने आता महानिर्मितीची वीजनिर्मिती वाढली आहे.

वाचा सविस्तर...

12:16 (IST) 29 Mar 2024
छ. संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण; नेमकं प्रकरण काय?

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तापला आहे. राज्य सरकारने अधिसूचना काढून मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, मराठा समाज आगामी काळात अधिक तीव्रतेने आंदोलन करणार असल्याचं समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठका चालू आहेत. अशीच एक बैठक आज (२९ मार्च) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन गट भिडल्याचं पाहायला मिळालं.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी काही जणांनी एकमेकांवर हल्ला केला. बराच वेळ दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

12:01 (IST) 29 Mar 2024
कल्याणमध्ये शिवसेनेचे बाळ हरदास, जिजाऊचे नीलेश सांबरे यांची भेट; लोकसभा निवडणुकीसाठी सहकार्याची गळ

कल्याण मधील ज्येष्ठ शिवसैनिक आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान बाळ हरदास यांची गुरुवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक असलेले जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे यांनी भेट घेतली.

सविस्तर वाचा...

12:01 (IST) 29 Mar 2024
ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमोल कीर्तिकर यांना पुन्हा समन्स

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कीर्तिकर यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुन्हा समन्स बजावले असून त्यांना ८ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

11:42 (IST) 29 Mar 2024
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नक्षलवादी पुन्हा सक्रिय; गडचिरोलीत आदिवासी नागरिकाची निर्घृण हत्या

गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका आदिवासी नागरिकाची गळा आवळून हत्या केली. अशोक तलांडी ( रा.दामरंचा) असे मृत व्यक्तीचे नाव असून आज, शुक्रवारी सकाळी भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

वाचा सविस्तर...

11:37 (IST) 29 Mar 2024
नाशिकच्या जागेवरील संभ्रम कायम – महायुतीत नाशिकच्या जागेवरुन गोंधळ सुरुच

महायुतीतील तीनही पक्षांनी दावा केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाशिक मतदारसंघाची जागा नेमकी कुणाला मिळणार, याविषयीचा संभ्रम अद्याप कायम आहे.

सविस्तर वाचा...

11:33 (IST) 29 Mar 2024
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…

बुलढाणा : नांदुरा अर्बन बँकेच्या एका कर्मचाऱ्याने इतर कर्मचाऱ्यांच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने पाच कोटी ४५ लाख रुपये अपहार केल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशीअंती अपहाराचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. सदर रक्कम ही विविध खात्यात ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आली.

वाचा सविस्तर...

11:31 (IST) 29 Mar 2024
अद्भूत! एक महिन्यापासून घरांवर दगडफेक, कोण करतंय?

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एका गावात एक महिन्यापासून घरांवर घगड येऊन पडतात. ही दगडफेक कोण करतय हे पोलीस सुध्दा अद्याप शोधून काढू शकले नाही. त्यामुळे गुढ कायम आहे. ईसासनी गावातील वार्ड क्र.४ भीमनगर येथे तब्बल एक महिण्यापासून सुरू असलेल्या गोटमारीच्या सत्रामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असून गावांत भयाचे वातावरण पसरले आहे.

वाचा सविस्तर...

11:26 (IST) 29 Mar 2024
"...आता इक्बाल मिर्चीलाही क्लीनचिट", प्रफुल्ल पटेलांविरोधातला कथित भ्रष्टाचाराचा खटला बंद करताच राऊतांची प्रतिक्रिया

राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्याविरोधात २०१७ मध्ये नोंदविण्यात आलेला भ्रष्टाचाराचा खटला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बंद केल्याची माहिती आहे. ‘वायर’ या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार पटेल यांना निर्दोषत्व बहाल केल्यानंतर ठाकरे गटाने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, प्रफुल पटेल यांच्या भ्रष्टाचाराबाबत भाजपाने मोठा बोलबाला केला होता, आता भाजपाच त्यांना क्लीन चीट देत आहे. जर तसा घोटाळा झाला नसेल तर पंतप्रधान मोदींसह सर्व भाजपावाल्यांनी देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागायला हवी.

11:22 (IST) 29 Mar 2024
माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचे निधन

माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या जेष्ठ नेत्या मिनाक्षी पाटील यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

सविस्तर वाचा...

11:21 (IST) 29 Mar 2024
नागपूर: ७ वर्षीय चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार

आठवडी बाजारातून अपहरण केलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार केला.

सविस्तर वाचा...

11:21 (IST) 29 Mar 2024
अकोल्यात काँग्रेसचे ठरेना; उमेदवाराची प्रतीक्षा

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप व वंचित आघाडीच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाले असून ते प्रचाराला देखील लागले आहेत.

सविस्तर वाचा...

11:20 (IST) 29 Mar 2024
सकाळच्या डोंबिवली, कल्याण लोकल रद्द केल्याने प्रवासी संतप्त

गुड फ्रायडेनिमित्त सरकारी सुट्टी असली तरी खासगी क्षेत्रात काम करणारा नोकरदार वर्ग सर्वाधिक संख्येने आहे.

सविस्तर वाचा...

11:17 (IST) 29 Mar 2024
नागपुरातील कर्करुग्णांचे हाल! लिनिअर एक्सिलेटर नसल्याने…

नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) लिनिअर एक्सिलेटर यंत्र मंजूर असून तातडीने ते घेण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानंतरही विविध तांत्रिक कारणाने हे यंत्र खरेदी झाले नाहीत.

सविस्तर वाचा...

11:17 (IST) 29 Mar 2024
धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा खेळ…जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव

पुणे : पुणे स्थानकावरील दुपारची वेळ. फलाटावरून वेगाने एक्स्प्रेस गाडी पुढे जात होती. त्याचवेळी धावत आलेला एक प्रवासी गाडी पकडण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याचा तोल गेला. तो फलाट आणि गाडीच्या मध्ये पडताच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने धाव घेत या प्रवाशाला बाहेर ओढून काढत त्याचा जीव वाचविला. प्रवाशाचा जीव वाचविणाऱ्या जवानाचे नाव दिगंबर देसाई असे आहे.

सविस्तर वाचा...

11:16 (IST) 29 Mar 2024
नाशिक : सकल मराठा समाजाकडून लोकसभेसाठी चाचपणी

नाशिक : लोकसभेच्या नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागा लढण्याची तयारी सकल मराठा समाज करत आहे. नाशिकमध्ये मराठा समाजाचा उमेदवार दिला जाईल तर, दिंडोरी राखीव मतदार संघात समाजाकडून उमेदवार पुरस्कृत करण्याचा विचार आहे.

सविस्तर वाचा...

11:15 (IST) 29 Mar 2024
पिंपरी : मालमत्ता करातून महापालिका मालामाल; ९१० कोटी तिजोरीत

पिंपरी : महापालिका तिजोरीत मालमत्ता करातून ९१० कोटी रुपये जमा झाले आहेत. एक हजार कोटी रुपयांचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसांत ९० कोटी वसूल करण्याचे आव्हान कर संकलन विभागापुढे असणार आहे.

सविस्तर वाचा...

11:12 (IST) 29 Mar 2024
"वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला", प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले, "आम्ही आता त्यांना..."

संजय राऊत म्हणाले, आमची लढाई ही संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या विरोधात आहे. प्रकाश आंबेडकर जे काही बोलत आहेत त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसलो. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली, अनेक बैठका केल्या, या बैठकांमध्ये वंचितचे प्रतिनिधी आणि काही वेळा स्वतः प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. आम्ही आता प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेच्या पाच जागांचा प्रस्ताव दिला आहे. आता त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घ्यायचा आहे.

devendra fadnavis eknath shinde

महायुतीत धुसफूस, शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपाला इशारा

लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली. मात्र, तरीही महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावापाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. महायुतीमध्ये काही जागांवरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. यामध्ये नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवसह काही जागांचा तिढा आहे. या जागावाटपावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपाला एक मोलाचा सल्ला देत सूचक इशारा दिला आहे. ‘भाजपाने शिवसेनेबरोबरची मैत्री जपावी, अन्यथा शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण होईल’, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.

“शिवसेनेचे सर्व खासदार विश्वास ठेवून आपल्याबरोबर आले आहेत. त्यामुळे तेवढी तरी मैत्री जपली पाहिजे. मला असे वाटते की, तुम्ही (भाजपाने) त्या जागा सोडून वाद घातला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, यवतमाळ, नाशिक या जागा शिवसेनेच्या आहेत. तरीही तुम्ही या जागा मागत असाल तर सहाजिकच शिवसैनिकांच्या मनामध्ये चीड निर्माण होईल. आपल्या हक्काच्या जागा अशा पद्धतीने दबावतंत्राने मागत असतील तर हे फार वाईट असून याचा संदेश चांगला जात नाही”, असे अर्जून खोतकर म्हणाले.