पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. वंशवादाचे प्रतीक तर मी देखील आहे. पण, जर मी जनतेच्या मनात असेल तर, मोदीही मला संपवू शकणार नाहीत, असे वक्तव्य भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं असून, वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावरती आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडे यांनी पाठराखण केली आहे.

“गेली अडीच वर्षे पंकजा मुंडेंवर टीकाटीप्पणी केली जात नव्हती. मात्र, भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून पंकजा मुंडेंवर टीका करण्यात येत आहे. भगवानगडावर घेण्यात येत असलेल्या दसरा मेळाव्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी एका पक्षाच्या राज्य कार्यकारणी स्तरावरील लोकांना फूस लावली जात आहे,” असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे.

हेही वाचा – “…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, बीडमधील वक्तव्यावर VIDEO पोस्ट करत पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“महाराष्ट्रात एकमेव पंकजा मुंडेंना राजकीय दृष्ट्या बदनाम, नामोहरम करणे हाच एककलमी कार्यक्रम काही लोक चालवतात. पण, काहींना हेच समजत नाही, आपल्या एका सहकाऱ्याची राजकीय हत्या करून पक्षाला काहीच मिळणार नाही आहे,” असा इशारा प्रकाश महाजन यांनी भाजपाला दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी”

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, “मी अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं असेल, तर मला कुणीही पराभूत करू शकत नाही, ही त्यांची भावना असेल, त्यांनी मोंदीचं नाव नेमक्या कोणत्या अर्थाने घेतलं, हे कदाचित मला सांगता येणार नाही. पण यातून मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे. मला वाटतं त्या मोदींना आव्हानही देऊ शकत नाही आणि त्यांच्या विधानाचा तसा अर्थही घेऊ नये. कारण त्या पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेकदा मोदींबाबत किंवा पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत नाराजी व्यक्ती केली आहे. तरीही त्या केंद्रीय नेत्यांचं नेतृत्व मान्य करून आपल्या पक्षासाठी काम करत आहेत,” असेही खडसे म्हणाले.