कर्नाटकातून आलेला बेकायदा गुटखा पुण्याकडे जात असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे पकडण्यात आला. तालुका पोलिसांनी कंटेनरसह पावणेदोन कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोंडीराम पवार आणि इस्माईल शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुटखा गुलबर्गा येथून तुळजापूरच्या दिशेने जात असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून मंद्रुपकडून येणाऱ्या दोन्ही कंटेनरचा पाठलाग करण्यात आला. दोन्ही कंटेनरला कोंडी येथील पाकणीजवळ थांबविण्यात आले. कंटेनरमधील चालकाकडे विचारणा केली असता, दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

हेही वाचा : तीन खुनांच्या घटनांनी औरंगाबाद हादरले; भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंटेनरच्या चालकाचा संशय आल्याने या कंटेनरची पोलिसांनी पाहणी केली. आतमध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये गुटखासदृश माल भरलेला असल्याचे दिसून आले. दोन्ही कंटेनर सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे नेऊन पाहणी करण्यात आली. यात गुटखा, सुगंधी तंबाखूची ८०० पोती आढळून आली. एक कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि ४५ लाखाचे दोन कंटेनर पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.