शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव टाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सचिन वाझे यांच्याकडून ‘मातोश्री’वर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. मात्र, आता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी या आरोपापासून घुमजाव करत उद्धव ठाकरेंवर थेट टीका करणे टाळले आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, एकनाथ शिंदे म्हणतात…

काय म्हणाले प्रतापराव जाधव?

“माझ्या बोलण्याचा आशय एवढाच होता, की राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे हे उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळचे होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी, ”वाझे बारमालकांकडून १०० कोटी जमा करतात”, असा आरोप केला होता. वाझेंवर त्यावेळी पोलीस केसेस दाखल करण्यात आल्या, त्याची चौकशी झाली. आज वाझे आणि अनिल देशमुख जेल आहेत. एवढंच मला म्हणायचं होतं”, असं ते म्हणाले.

हेही वाचा – “सचिन वाझे हे ‘मातोश्री’वर दर महिन्याला…”; शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतापराव जाधवांनी काय म्हणाले होते?

नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर झाले. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांच शहरातून रॅली काढत जोरदार स्वागत केलं. यावेळी आयोजित हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमात मात्र शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. “अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते”, असा गौप्यस्फोट प्रतापराव जाधव यांनी केला होता.