शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुलुंडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीका केली. यानंतर मनसेच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून सुषमा अंधारेवर सडकून टीका होत आहे. सोशल मीडियावर अनेक मनसे कार्यकर्त्यांनी सुषमा अंधारे यांचा भाषणासाठी स्टुलवर उभं राहिल्याचाही फोटो व्हायरल करण्यात आला. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं. त्या मंगळवारी (६ डिसेंबर) उस्मानाबादमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “माझ्या पायाखाली स्टुल आहे याने मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी बदलू शकतात? उगाच आपलं वडाची साल पिंपळाला लावून चालत नाही.”

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

“दादांनो नोकरभरतीचं काय झालं?”

“मी यांना प्रश्न विचारत आहे की दादांनो नोकरभरतीचं काय झालं? मी विचारतेय की, स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलं की आमचा उत्पन्नाचा मार्ग वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या अर्जासाठी भरलेलं चलन आहे. हे विशेष आहे. आरोग्य भरती, पोलीस भरती, शिक्षक भरती, टीईटी, सीईटी अशा वेगवेगळ्या परीक्षांसाठी पोरांनी ३०० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत चलन असते. हे अगदी १२०० रुपयांपर्यंतही चलन असते,” असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

“प्रत्येक गरीबाच्या घरात १५०० रुपये असत नाहीत”

“याच मुलांकडून महा-ई-सेवा केंद्राने अर्ज भरण्याचे प्रत्येकी २०० रुपये घेतले. १२०० रुपये चलन भरले आणि परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी. तिथं जायला परत ५०० रुपये वेगळे लागतात. प्रत्येक गरीबाच्या घरात १५०० रुपये असत नाहीत. गरीबांनी घरातील शेळ्या मेंढ्या विकून हे पैसे भरले,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : Photos : “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात, कारण…”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

“तो नेता जिथं कुठं असेल तर त्याला चहापाणी करा”

मनसेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षाने सुषमा अंधारेंची सभा उधळून लावण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरही अंधारेंनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “मनसेचा नेता म्हणाला की, आम्ही सुषमा अंधारेंची सभा उधळून लावू, पण काल सभा उधळलीच नाही. त्यांनी आज तरी सभा उधळायला यायचं होतं. त्यांचं गपाट की काहीतरी नाव होतं. हे असेच गपाटे लोकं असतात. उगाच गप्पा ठोकत राहतात. बरं आज तो नेता जिथं कुठं असेल तर त्याला चहापाणी करा. आपण चहापाणी करून पाहुणचार केला पाहिजे.”

“उगाच शेळीने उंटाचा मुका घ्यायला गेलं म्हणजे जमतं का?”

“तो म्हणतो सुषमा अंधारेंची सभा उधळेल, पण अरे काय वाघा, इथं माणसं किती, तुझ्यासोबत बोलताना माणसं किती? उगाच शेळीने उंटाचा मुका घ्यायला गेलं म्हणजे जमतं का? असं कुठं असतं का? मला बोलायला भाग पाडू नका,” असा इशारा सुषमा अंधारे यांनी मनसेला दिला.

हेही वाचा : VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

“मी कायदा पाळणारं लेकरू आहे”

“मी दहावेळा सांगते की, मी कायदा पाळणारं लेकरू आहे, मी कायद्याच्या चौकटीत राहून बोलणारं लेकरू आहे. मी जो विचार मांडते त्या विचाराला विचाराने उत्तर द्या ना. मी आरोप किंवा टीका करत नाही, तर मुद्दे मांडते आहे, प्रश्न विचारते आहे,” असंही अंधारेंनी म्हटलं.