सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटकांच्या बोटीला जलसमाधी मिळाली आहे. या अपघातामध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झालाय. जय गजानन नावाची २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किनाऱ्यावर आणत असताना ती बुडून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर सात जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून, ११ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: श्वासांसाठी धडपड, आरडाओरड अन् धावपळ…; तारकर्ली बोट दुर्घटनेनंतरचे धक्कादायक फोटो

आकाश भास्करराव देशमुख (वय ३० रा. शास्त्रीनगर अकोला), डॉ. स्वप्नील मारुती पिसे (वय ४१ आळेफाटा, पुणे) अशी दोन्ही मृतांची नावं आहेत. रश्मी निशेल कासुल (वय ४५ रा. ऐरोली, नवी मुंबई) यांच्यावर रेडकर हॉस्पीलट येथे तर संतोष यशवंतराव (वय ३८ बोरिवली, मुंबई), डॉ. अविनाश झांटये हॉस्पीटल येथे उपचार सुरु आहेत.

तसेच, मृणाल मनिष यशवंतराव (वय ८), ग्रंथ मनिष यशवंतराव (वय दीड वर्ष), वियोम संतोष यशवंतवराव (वय- साडेचार वर्ष), सर्व रा. बोरिवली मुंबई. वैभव रामचंद्र सावंत(वय ४० रा. वायरी तारकर्ली), उदय भावे (वय ४० ऐरोली, नवी मुंबई ) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुभम गजानन कोरगावकर (वय २२) शुंभागी गजानन कोरगावकर, (वय २६ रा. दोघेही केरवडे , कुडाळ) लैलेश प्रदिप परब (वय ३०), अश्विनी लैलेश परब (वय ३० रा. दोघेही कुडाळ). मुग्धा मनिष यशवंतराव (वय ४०) मनिष यशवंतराव (वय ४०) आयुक्तीे यशवंतराव (३१ रा. सर्व बोरिवली, मुंबई). सुशांत आण्णाासो धुमाळे (वय ३२), गितांजली धुमाळे (वय २८रा. दोघेही जयसिंगपूर जि. कोल्हापूर). प्रियन संदिप राडे (वय १४ रा. प्रज्ञानंद नगर, पुणे), व सुप्रिया मारुती पिसे (वय ३१ रा. पुणे) यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.