लोकसभा निवडणूक ही जनता विरुद्ध भाजपा अशी झाली आहे असं मत प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच १० जागांवर पोटनिवडणूक आहे, त्या ठिकाणीही जर असेच निकाल आले तरच मी म्हणेन की मतदार शिफ्ट झाला. मात्र तसं घडलं नाही तर ही तात्पुरती फेज आहे असं म्हणता येईल असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. तसंच उद्धव ठाकरेंबाबत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

आम्हाला फटका बसलेला नाही

महाविकास आघाडी बरोबर न गेल्याने आम्हाला फटका बसलेला नाही. याऊलट लोकांचा काही नेत्यांवरचा विश्वास उडत चालला आहे. दलित आणि मुस्लिम उमेदवार जर मविआबरोबर गेला असेल तर जुलैमधल्या पोटनिवडणुकीत ते चित्र स्पष्ट होईल. ही फेज ता्त्पुरती आहे. विधानसभेत तर चित्र कळेलच. पण त्याआधी पोटनिवडणुका होणार आहेत त्यामध्येही समजेल असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत हे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Om Rajenimbalkar Manoj Jarange Patil
“मराठ्यांच्या अन्नात माती कालवू नका”, मनोज जरांगेंचा खासदार ओम राजेनिंबाळकरांवर संताप; नेमकं प्रकरण काय?
rohit pawar chhagan bhujbal
“छगन भुजबळ पक्ष सोडणार, त्यांच्याबरोबर…”, रोहित पवारांचा दावा; पक्षांतराची वेळही सांगितली
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
Eknath Shinde Uddhav Thackeray
Maharashtra News Update: “वारसा सांगणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तितांजली दिली”; एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका!
What Amit Thackeray Said?
‘बिनशर्ट’च्या वक्तव्यावर अमित ठाकरेंचं काका उद्धव ठाकरेंना उत्तर, “राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने ज्यांचा मुलगा..”
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
kashmira pawar satara arrested forged as pmo appointed
साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!
ajit-pawar (9)
Maharashtra MLC Election Update: “घड्याळाची विजयी सलामी”, विधानपरिषद निकालानंतर अजित पवारांची सूचक पोस्ट!

हे पण वाचा- विधानसभेसाठी ‘वंचित’ची स्वबळाची चाचपणी

पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप करुदेत हरकत नाही

पृथ्वीराज चव्हाण माझ्यावर आरोप करत असतील तर करुदेत. मात्र नागपूर आणि कोल्हापूरमध्ये आमचा पाठिंबा का घेतला? त्यांनी उत्तर द्यावं. आम्हाला कुठलाही डॅमेज वगैरे झालेला नाही. भाजपाचे नेते काय म्हणतात ते सोडा. पण एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी ही जी लढत झाली. त्यात एकनाथ शिंदेंनाही कमी मतं मिळाली नाहीत. एकनाथ शिंदेंच्या मतांमध्ये दलित, ख्रिश्चन, भटके, मुस्लीम यांची मतं नाहीत. ही जर तुलना पाहिली तर हिंदू मतांचं प्रमाण हे एकनाथ शिंदेंकडे जास्त आहे. मी भाजपाचं उदाहरण जाणीवपूर्वक देत नाही. पण त्यांचाही मतदार बोलका आहे असं मला वाटतं. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

उद्धव ठाकरे हे जर महाविकास आघाडीबरोबरची आघाडी टिकवली तर त्यांचा फायदा होईल. उद्धव ठाकरेंचा मतदार सध्या एकनाथ शिंदेंच्या बाजूने झुकलेला दिसतो आहे. तो पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनेही जाऊ शकतो. पण उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडी बरोबरच राहिले तर त्यांचा फायदा होईल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे हे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत हे नाकारता येणार नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- बौद्ध, दलितांना शहाणे होण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

काँग्रेसच्या नेत्यांबाबत मी काहीही मत व्यक्त करत नाही. महाराष्ट्रातल्या नेत्यांना मी महत्त्व देत नाही कारण तिथे हायकमांडची पद्धत आहे. हायकमांडकडून जे सांगितलं जातं तेच पुढे फॉलो होतं असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.