सातारा : जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था यांच्यावतीने सातारा येथे १० ते १२ जानेवारी या कालावधीत ‘शोध मराठी मनाचा’ जागतिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी रामदास फुटाणे यांनी सांगितले की, या संमेलनात शुक्रवारी (दि.१०) सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘लक्ष्मीची पावले’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये हनुमंत गायकवाड व रामदास माने सहभागी होणार आहेत, ‘समुद्रापलीकडे’ या कार्यक्रमात गणेश ठकार, प्राजक्ता वसई, अनिल नेरुळकर, प्रसाद वझे, सचिन जोशी व नेपोलियन शिंदे सहभागी होणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

maharashtras public universities face clamor over vacant professor posts recruitment planned through psc
प्राध्यापक भरती प्रस्ताव अर्थखात्याकडे, पण प्राचार्य फोरम म्हणते…
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Gautam Adani announces a donation of Rs 10,000 crore for social service to celebrate his son's wedding.
Jeet Adani Marriage : मुलाच्या विवाहानिमित्त गौतम अदाणी यांच्याकडून समाजसेवेसाठी दहा हजार कोटी रुपये
Superstition Eradication Committee to launch courses for public education against superstition
अंधश्रद्धाविरोधी लोकशिक्षणासाठी अंनिस अभ्यासक्रम सुरू करणार
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार

हेही वाचा…नौदलात नोकरीचे आमिष दाखवून, सात बेरोजगारांना गंडा

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी जागतिक मराठी भूषण पुरस्कार हनुमंत गायकवाड आणि जागतिक मराठी गौरव पुरस्कार राजीव खांडेकर यांना देण्यात येणार आहे.

शनिवारी (दि. ११) सकाळी ‘मुक्काम पोस्ट सातारा’ या कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे, किरण माने, संतोष पाटील सहभागी होणार आहेत. ‘आकाशाशी जडले नाते’ या कार्यक्रमात अहिल्यानगरच्या नीलम इंगळे व अमेरिकेचे आमोद केळकर सहभागी होणार आहेत. ‘अभिजात मराठी आणि माध्यमे’ या विषयावर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नितीन ठाकरे (नाशिक), चंद्रकांत दळवी, जगन्नाथ पाटील (बंगळुरू) व मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी सहभागी होणार आहेत. ‘आधारवड’ या कार्यक्रमात डॉ. भरत केळकर, डॉ. गिरीश कुलकर्णी व डॉ. विश्वास सापडणेकर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ‘चित्र शिल्पकार्य’ यामध्ये मंदार लोहार (सातारा), सचिन खरात (सोलापूर), कवी शिंदे, विठ्ठल वाघ, अशोक नायगावकर, नितीन देशमुख, मीनाक्षी पाटील, अंजली कुलकर्णी, वैशाली पतंगे, भूषण कुलकर्णी, प्रशांत शानबाग, योगेश नेर, समीर जिरांगलीकर हे सहभागी होणार आहेत. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा…विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला मनुष्यबळ पुरवठा करणारा ठेका रद्द; तक्रारींनंतर मंदिर समितीकडून कारवाई

रविवारी (दि.१२) सकाळी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व सायबर सुरक्षा’ या विषयावर विवेक सावंत (पुणे), मंगेश आमले (मुंबई) व रवींद्रनाथ हिरोळीकर (पुणे) हे मार्गदर्शन करणार आहेत. ‘रुपया, डॉलर व बिटकॉइन’ या विषयावर विद्याधर अनास्कर (पुणे), डॉ. नीरज हातेकर (वाई) व जयराज साळगावकर (मुंबई) हे मार्गदर्शन करणार आहेत. संमेलनाचा समारोप खासदार उदयनराजे भोसले व चित्रपट निर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Story img Loader