News Flash

‘दीदी तेरा दादू दीवाना’, क्रितीच्या बोल्ड फोटोवर कमेंट केल्यामुळे अमिताभ बच्चन झाले ट्रोल

त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने नुकताच सोशल मीडियावर एक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तिच्या या पोस्टवर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील कमेंट केली आहे. पण अमिताभ यांनी कमेंट करताच त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.

क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘माझ्यासोबत कोणी सालसा करेल का?’ असे कॅप्शन दिले होते. अमिताभ बच्चन यांनी कमेंट करत ‘Wow’ असे म्हटले आहे. त्यांची ही कमेंट पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

एका यूजरने ‘दीदी तेरा दादू दीवाना’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘दीदी दादू की भावनाओं में सम्मान है आपके लिए. Wow…’ असे म्हटले आहे. एका यूजरने तर ‘बच्चन सर मजा करत आहेत’ असे म्हणत ट्रोल केले आहे.

काहींनी बिग बींने केलेल्या कमेंटची प्रशंसा केली आहे. एका यूजरने, ‘मला कळत नाही त्यांनी केलेल्या कमेंटमध्ये चुकीचे काय आहे’ असे म्हटले आहे.

लवकरच क्रिती दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. ती दाक्षिणात्य सुपस्टार प्रभास आणि सैफ अली खानसोबत या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे तर सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. तसेच हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षाकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 10:33 am

Web Title: amitabh bachchan gets troll for commenting on kriti sanon bold photo avb 95
Next Stories
1 रंग बरसे..
2 राष्ट्रीय पुरस्कारांवर ची मराठी मोहोर
3 हृतिक रोशन आणि सैफ अली खान आमनेसामने
Just Now!
X