News Flash

VIDEO : अजमेर शरीफच्या दर्ग्यात पोहोचली अंकिता लोखंडे

चित्रपटाच्या यशासाठी केली प्रार्थना

अंकिता लोखंडे

‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अभिनेत्री कंगना रणौत मुख्य भूमिका साकारत आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटात अंकिताचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाला यश मिळावं यासाठी प्रार्थना करायला ती अजमेर शरीफ दर्ग्यात पोहोचली.

‘या दर्ग्यात मी तिसऱ्यांदा येत आहे. प्रत्येक वेळी इथे मी जी प्रार्थना करते, इच्छा मागते ती पूर्ण होतेच. जोधपूरमध्येच शूटिंग सुरु आहे, म्हणून मी इथे आवर्जून आली आहे. माझ्या चित्रपटाच्या यशासाठी मी प्रार्थना केली,’ असं ती यावेळी म्हणाली.

वाचा : स्वत:च्या लग्नासाठी या अभिनेत्याने उघडली ‘मॅट्रिमोनियल साइट’

या चित्रपटात अंकिता ‘झलकारी बाई’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. काही दिवसांपूर्वी तिने चित्रपटातील लूकसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला होता. अंकिता साकारत असलेली झलकारी बाईची भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लक्ष्मीबाईच्या सैन्यातील त्या महत्त्वपूर्ण व्यक्ती होत्या. राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत त्या नेहमी उभ्या असायच्या. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात ऐतिहासिक कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 6:20 pm

Web Title: ankita lokhande prays at ajmer sharif for the success of manikarnika the queen of jhansi
Next Stories
1 स्वत:च्या लग्नासाठी या अभिनेत्याने उघडली ‘मॅट्रिमोनियल साइट’
2 Bigg Boss 11: अर्शी खान खोटारडी, तिच्या आईनेच केला खुलासा
3 पुन्हा एकदा कपड्यांवरुन चर्चेत आली विद्या बालन
Just Now!
X