News Flash

“असा होता आमचा प्रवास”, ‘ते’ खास व्हिडीओ शेअर करत अंकिताने दिला सुशांतच्या आठवणींना उजाळा

अंकिता आणि सुशांत ६ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. या सहा वर्षांच्या आठवणींना अंकिताने या व्हिडीओच्या माध्यमातून उजाळा दिलाय.

(Photo: Ankita Lokhande/Instagram)

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालंय. सुशांतने या जगाचा निरोप घेतला असला तरी आजही तो आठवणींच्या रुपात चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचेलल्या सुशांतचं चाहत्यांसोबतही घट्ट नातं निर्माण झालं होत. एवढचं नाही तर या मालिकेदरम्यान त्याचं आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेचं देखील प्रेम बरहू लागलं होतं. सुशांत आणि अंकिता अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

सुशांतच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या घरी हवन ठेवल्याचं लक्षात येतंय. अंकिताने तिच्या इन्स्टास्टोरीला एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात एक हवन कुंड दिसत असून देवासमोर दिवा उजळत असल्याचं पाहायला मिळतंय.

ankita-lokhande-sushant-singh-rajput (photo-instagram/ankitalokhande)

आणखी वाचा: पुण्यतिथी: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर काय घडलं वर्षभरात?

तर अंकिताने दोन व्हिडीओ शेअर करत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिलाय. अंकिताने सुशांतसोबत व्यतीत केलेल्या खास क्षणांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिता आणि सुशांत ६ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. या सहा वर्षांच्या आठवणींना अंकिताने या व्हिडीओच्या माध्यमातून उजाळा दिलाय. या व्हिडीओत अंकिता आणि सुशांतचे अनेक क्यूट फोटो पाहायला मिळत आहेत. “असा होता आमचा प्रवास!!! फिर मिलेंगे चलते चलते” असं खास कॅप्शन अंकिताने या व्हिडीओला दिलंय. हा व्हिडीओ पाहून अनेक कलाकारांसोबतच सुशांतचे चाहते भावूक झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

आणखी वाचा: ग्रह-ताऱ्यांची होती आवड आणि महादेवाचा भक्त होता सुशांत सिंह राजपूत

अकिंता लोखंडे सध्या विकी जैनला डेट करत आहे. मात्र असं असलं तरी अंकिता सुशांत आणि तिच्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलताना दिसते. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर २०११ सालातील दिवाळीचा एक व्हिडीओ देखील शेअर केलाय. ज्यात ती सुशांतसोबत डान्स करताना दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर लगेचच अंकिताने सोशल मीडियावरून सुशांतला श्रद्धांजली न वाहिल्याने तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र काही महिन्यांनी अंकिताने पुढे येत अनेक महत्वाच्या गोष्टींचा उलगडा केला. यात सुशांत रियासोबत आंनदात नव्हता असं देखील अंकिता म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 2:32 pm

Web Title: ankita lokhande share unseen video with sushant singh rajput memories goes viral kpw 89
Next Stories
1 सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला?; सीबीआयने दिली माहिती
2 पुण्यतिथी: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर काय घडलं वर्षभरात?
3 Kirron Kher Birthday Special: दीपिका पादुकोणच्या वडिलांसोबत राष्ट्रीय स्तरावर खेळल्या आहेत बॅडमिंटन
Just Now!
X