News Flash

…अन् शाहरुख अनुपम खेर यांना म्हणाला, ‘मन्नतवर या आपण सापशीडी खेळू’

तुम्ही घरी परत या. आपण सापशीडी खेळू. वाळूचे किल्ले तयार करु

...अन् शाहरुख अनुपम खेर यांना म्हणाला, 'मन्नतवर या आपण सापशीडी खेळू'

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि अनुपम खेर यांनी दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट शाहरुखच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीमधील पहिल्या क्रमांकावरील चित्रपट असून बॉलिवूडच्या इतिहासात या चित्रपटाने नाव कोरले होते. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई देखील केली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटात अनुपम खेर आणि शाहरुखने वडिल-मुलाची भूमिका साकारली होती.

चित्रपटाच्या प्रदर्शनाला तब्बल २४ वर्षे उलटून गेली आहेत. आता अनुपम खेर यांच्या मनात चित्रपटाच्या काही आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यांनी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देणारं तसेच शाहरुखची आठवण येत असल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ‘माझा प्रिय शाहरुख! सहजच! न्यूयॉर्कमध्ये तुझी अचानक आठवण आली. आपण खूप सुंदर वेळ सोबत घालवला आणि आता आपण सर्वच मोठे झालो! खूप प्रेम आणि शुभेच्छा #DilwalwDulhaniyaLeJayenge’ असे अनुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले.

अनुपम यांचे हे ट्विट वाचतात शाहरुख खानने त्यांना सुंदर उत्तर दिले आहे. ‘नाही Daddy Cool! मोठे होऊ देत तुमचे शत्रू. आपल्या दोघांचीही मनं तर लहान मुलांसारखी आहेत. तुम्ही घरी परत या. आपण सापशीडी खेळू. वाळूचे किल्ले तयार करु. तुम्हाला मिस करतोय’ असे शाहरुखने ट्विटमध्ये लिहिले. हे ट्विट चाहत्यांनी वाचताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

प्रत्येक सिनेमाप्रेमी व्यक्तीच्या मनात घर करून बसलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटाला आता पर्यंत अनेक सन्मान मिळाले आहेत. हा सिनेमा गेल्या १०० वर्षांतील रसिकांचा सर्वांत आवडता चित्रपट म्हणून निवडला गेला होता. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या बहारदार अभिनयामुळे देश-विदेशातील रसिक या चित्रपटाच्या प्रेमात पडले होते. आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने हा चित्रपट पाहतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 10:46 am

Web Title: anupam kher tweets hes missing shah rukh khan superstar invites daddy cool home for snakes and ladders
Next Stories
1 ‘कटप्पा’सोबत ऐश्वर्या करणार ऑनस्क्रीन रोमान्स
2 ‘मेरे साई’ मालिकेत मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले महत्त्वपूर्ण भूमिकेत
3 मोदींवर बायोपिक म्हणजे थट्टेचा विषय- उर्मिला मातोंडकर
Just Now!
X