27 October 2020

News Flash

Baaghi 2 trailer: दिशासाठी टायगरचा ‘वन मॅन आर्मी’ शो

३० मार्च रोजी प्रदर्शित होणार हा चित्रपट

'बागी २'

टायगर श्रॉफची मुख्य भूमिका असलेल्या ‘बागी’ या चित्रपटाचा सिक्वल ‘बागी २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. टायगरसोबत या चित्रपटात दिशा पटानी नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये एकीकडे टायगरचा जबरदस्त अॅक्शन अवतार आणि दुसरीकडे दिशाचा साधेपणा अधोरेखित होतो. याशिवाय मनोज बाजपेयी, प्रतीक बब्बर, रणदीप हुडा आणि दिपक डोब्रियाल यांच्या सहाय्यक भूमिकाही थक्क करणाऱ्या आहेत.

रोनीच्या (टायगर) प्रेमकथेनेच ट्रेलरची सुरुवात होते आणि नेहा (दिशा) एका मोठ्या अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळते. तिच्या छोट्या बहिणीचे अपहरण होते आणि तिची सुटका करण्यासाठीच रोनी धडपड करत असतो. मार्शल आर्ट्स, टायगरची थक्क करणारी शरीरयष्टी आणि साहसदृष्ये विशेष लक्ष वेधून घेतात.

‘बेफीक्रे’ या अल्बमनंतर दिशा आणि टायगरचा हा पहिला एकत्रित चित्रपट आहे. अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात माधुरी दीक्षितचा ‘एक दो तीन’ या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जनही पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे जॅकलिन फर्नांडिस या प्रसिद्ध गाण्यावर थिरकणार आहे. ३० मार्च रोजी ‘बागी २’ प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 5:45 pm

Web Title: baaghi 2 trailer released tiger shroff turns into a one man army for disha patani
Next Stories
1 कंगना रणौत आणि बिपाशा बासूचा गितांजलीवर करारभंगाचा आरोप
2 ‘तो’ फोटो पाहून अनुष्का म्हणते…
3 सरकारी बसमध्ये ‘अय्यारी’चा फुकट शो, पायरसीपुढे दिग्दर्शक नीरज पांडे हतबल
Just Now!
X