News Flash

‘जर सगळ्या गोष्टी माहित आहेत तर सोनू सूदसारखी मदत का करत नाही?’, कंगनावर संतापली अभिनेत्री

जाणून घ्या सविस्तर...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही नेहमीच तिचे मत मांडताना दिसते. देवोलीनाने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, देवोलीनाने बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रनौतवर निशाना साधला आहे.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, करोनाच्या संकटावर देवोलिनाला प्रश्न विचारला. त्यावर देवोलीनाने सगळ्यात आधी रुग्णालयाची स्थिती, ऑक्सिजन आणि औषधांच्या अभावावर चिंता व्यक्त केली.

पुढे तिला विचारण्यात आले की, “कंगना तर बोलत आहे की ऑक्सिजन, औषधं आणि बाकी गरजेच्या सगळ्या वस्तू आहेत.” त्यावर देवोलीना म्हणाली, “कदाचीत त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी या उपलब्ध असतील, परंतु रुग्णालयात दररोज अनेक लोक ऑक्सिजनशिवाय, लसीशिवाय मरत आहेत. जर कंगनाला माहित आहे की ऑक्सिजन, बेड आणि लस उपलब्ध आहेत. तर, तिने सोनू सरांसारखं बाहेर येऊन सगळ्यांना मदत केली पाहिजे. जसे इंडस्ट्रीतील इतर लोक मदत करत आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलीना पुढे म्हणाली, “कंगनाने पुढे येऊन लोकांना सांगितलं पाहिजे की ऑक्सिजन कुठे मिळतं आहेत. लस कुठे मिळतं आहे. कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत. ज्या रुग्णालयात रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागतं आहे. तिथे जाऊन कंगनाने त्यांना मदत केली पाहिजे.”

करोनाची दुसरी लाट आल्यापासून अक्षय कुमार, सोनू सूदपासून सुनील शेट्टी पर्यंत अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 10:41 am

Web Title: devoleena bhattacharjee blasts kangana ranaut over coronavirus and oxygen says if she knows everything come out and help like sonu sood dcp 98
Next Stories
1 “आधी तुझ्या भावाला सांग”; ‘त्या’ पोस्टनंतर करीना कपूर झाली ट्रोल
2 पगार 25 हजार आणि फॉर्च्युनरचा हफ्ता 30 हजार, आस्ताद काळेचा नगरसेवकांना टोला
3 नाटककार शेखर ताम्हाणे यांचे निधन
Just Now!
X