News Flash

प्रत्येक ट्विटला क्रमांक देण्याविषयी बिग बी म्हणतात…

अमिताभ बच्चन यांनी मे २०१० मध्ये ट्विटर खाते सुरु केलं आहे.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांचा कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकाच वावर आहे. ट्विटरवर ते अनेक वेळा सक्रिय असतात. अमिताभ अनेक वेळा ट्विटरच्या माध्यमातून त्यांचं मत व्यक्त करत असतात. विशेष म्हणजे आजपर्यंत त्यांनी केलेल्या प्रत्येक ट्विटला ते क्रमांक देत असल्याचं पाहायला मिळतं. अमिताभ या ट्विटला क्रमांक का देतात या मागचं कारण त्यांनी अभिनेता शाहरुख खानला दिल्याचं पाहायला मिळाल आहे.

अमिताभ बच्चन यांनी मे २०१० मध्ये ट्विटर खाते सुरु केलं आहे. १६ मे २०१० रोजी त्यांनी पहिलं ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर आजतागायत ते रोज एक ट्विट करत असतात. त्यांच्या नियमित सक्रियतेमुळे ट्विटरवरदेखील त्यांचा फॅन फऑलोअर्स मोठा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत अमिताभ यांचं नाव आघाडीवर असतं.

शाहरुख आणि अमिताभ यांनी एका कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली होती. यावेळी बिग बी आपल्या प्रत्येक ट्विटला नंबर का देता ?असा प्रश्न शाहरुखने विचारला. त्यावर आतापर्यंत केलेल्या ट्विटपैकी हे कितव्या क्रमांकाच ट्विट आहे हे लक्षात येण्यासाठी नंबर देत असल्याचं त्यांनी सांगितलं.


“आतापर्यंत मी अनेक ट्विट केले आहेत. कधी कधी मी एकाच दिवशी दोन किंवा ३ ट्विटदेखील करतो. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या ट्विटपैकी हे कितवं ट्विट आहे हे लक्षात येण्यासाठी आणि कोणत्या दिवशी कोणत्याविषयावर मत मांडलंय हे लक्षात रहावं यासाठी मी माझ्या प्रत्येक ट्विटला क्रमांक देतो”, असं अमिताभ यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा आगामी बदलादेखील ८ मार्चला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री तापसी पन्नू झळकणार असून दुसऱ्यांदा ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 11:44 am

Web Title: know why amitabh bachchan numbers his tweets
Next Stories
1 बॉलिवूडमधली ही अभिनेत्री कंगनाला सर्वाधिक प्रिय
2 अमिताभ बच्चन यांनी विकली ‘रॉल्स रॉयस’ गाडी, १२ वर्षापूर्वी मिळाली होती भेट
3 कंगनासारखं बोलणं मला जमत नाही, आलियाचा पलटवार
Just Now!
X