News Flash

राजकुमार संतोषींच्या आगामी चित्रपटात दिसणार मनिषा कोईराला?

कॅन्सरशी यशस्वी झुंज दिल्यानंतर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला सर्व काही जुळून आल्यास लवकरच कॅमेऱ्याला सामोरी जाणार आहे.

| September 30, 2014 01:34 am

कॅन्सरशी यशस्वी झुंज दिल्यानंतर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला सर्व काही जुळून आल्यास लवकरच कॅमेऱ्याला सामोरी जाणार आहे. राजकुमार संतोषी यांच्या आगामी चित्रपटात ती दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनिषाची तब्येत आता चांगली असून, ती ठीक असल्याचे सांगत तिचे व्यवस्थापक सुब्रोतो घोष वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, मनिषा काही पटकथा वाचत असून, राजकुमार संतोषी यांच्या आगामी चित्रपटात काम करण्याचे तीने जवळजवळ निश्चित केले आहे. तिला पटकथा आवडली असून, सर्व काही जुळून आले, तर २०१५ च्या जानेवारी महिन्यात ती चित्रीकरणाला सुरुवात करेल. या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारेल, तर पंकज कपूरसुध्दा चित्रपटाचा भाग असणार आहेत. मनिषाने याआधी २००१ मध्ये राजकुमार संतोषींच्या ‘लज्जा’ चित्रपटात काम केले असून, आगामी चित्रपट हटके असल्याचे बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 1:34 am

Web Title: manisha koirala in rajkumar santoshis next film
Next Stories
1 शाहरूखला गर्व, ज्या चित्रपटात काम करतो तो हीट होतो
2 पाहा ‘उंगली’ चित्रपटाचे ट्रेलर
3 ‘बँग बँग’ने केली व्यक्तिगत जीवनात उभारण्यास मदत – हृतिक रोशन
Just Now!
X