News Flash

अभिनेत्री होण्यापूर्वी परिणिती चोप्रा अनुष्का शर्मासाठी करायची हे काम

परिणीतिने ‘Ask Me Anything’च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी तिने हा खुलासा केला आहे.

परिणीति लवकरच रणबीर कपूर सोबत 'अॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करतं ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच परिणीतिने सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा एका चाहत्यांने परिणीतिला तिची लेडी क्रश अनुष्का बद्दल प्रश्न विचारला.

परिणीतिने ‘Ask Me Anything’च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एक चाहत्याने तिला “तुझी लेडी क्रश अनुष्का शर्मा विषयी काही सांग” असा प्रश्न विचारला. अनुष्कासाठी ती पीआर म्हणजेच मीडियासोबत मुलाखती व्यवस्थापित करण्याच काम करायची. “मी ‘बॅन्ड बाजा बारात’साठी अनुष्काची पीआर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच आम्ही दोघी ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सह कलाकार म्हणून काम करत होतो. हे मस्त आहे ना?” असे उत्तर परिणीतिने दिले आहे.

parineeti chopra used to arrange media interviews for anushka sharma

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

काही दिवसांपूर्वी परिणीतिचे लागोपाठ ३ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ‘द गर्ल ऑन द ट्रेन’, ‘सायना’ आणि ‘संदीप और पिंकी फरार’ असे या तीन चित्रपटांची नावं आहेत. हे तीन ही चित्रपट लॉकडाऊनमुळे ओटीटी प्लॅटफर्मवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या चित्रपटांना जास्त लोकप्रियता मिळाली नाही मात्र, अनेकांना परिणीतिचा अभिनय प्रचंड आवडला आहे.

आणखी वाचा : Video : असा साजरा केला शिल्पा शेट्टीने आपला ४६ वा वाढदिवस

सध्या परिणीति तुर्कीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिथले अनेक फोटो परिणीतिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

दरम्यान, लवकरच परिणीति ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात परिणीतिसोबत अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना पहिल्यांदाच परिणीति आणि रणबीरची जोडी पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 6:31 pm

Web Title: parineeti chopra used to arrange media interviews for anushka sharma dcp 98
Next Stories
1 ‘रात्रीस खेळ चाले’मधील दत्ताला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…
2 The Family Man 2 : काय… अरविंदच आहे खरा व्हिलन?; ‘सुची’च्या वागण्याबद्दल शरद केळकरचा मोठा खुलासा
3 स्वत:ला ‘हॉट संघी’ म्हणत कंगनाने शेअर केले बिकिनीमधील फोटो
Just Now!
X