25 February 2021

News Flash

वाद निर्माण करायचा नाही, ‘श्रीदेवी बंगलो’वर प्रियाचं स्पष्टीकरण

श्रीदेवी हे फक्त माझ्या भूमिकेचं नाव आहे असं प्रियानं म्हटलं आहे.

आपल्या नजरेनं नेटकऱ्यांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वारियर ‘श्रीदेवी बंगलो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा अपघाती मृत्यू यात बरंच साम्य आहे म्हणूनच ट्रेलरवर बोनी कपूर यांनी आक्षेप घेतला होता. बोनी कपूर यांच्या आक्षेपानंतर पहिल्यांदाच प्रियानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

‘श्रीदेवी हे फक्त माझ्या भूमिकेचं नाव आहे. हा चित्रपट खरंच श्रीदेवी यांच्या जीवनाशी साधर्म्य दाखवणारा आहे का हे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनाच ठरवू दे पण आम्हाला कोणात्याही प्रकारचा वाद निर्माण करायचा नाही हे नक्की’ असं म्हणत प्रियानं आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रियाच्या ‘श्रीदेवी बंगलो’ चित्रपटात एका अभिनेत्रीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीचा शेवटी बाथटबमध्ये बुडून मृत्यू होतो असंही टीझरमध्ये दाखवण्यात आलं. श्रीदेवीचा मृत्यूही अशाच प्रकारे बाथटबमध्ये बुडून झाला होता त्यामुळे श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी टीझरवर आक्षेप घेत दिग्दर्शक प्रशांत मंबुली यांना कायदेशीर नोटीसही पाठवली होती. या नोटीसीनंतर प्रियानं एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 5:55 pm

Web Title: priya prakash varrier comes out in defence of sridevi bungalow
Next Stories
1 #10YearChallenge : मराठी कलाकार १० वर्षापूर्वीचे आणि आताचे
2 दीपिकानं रणवीरच्या या तीन गोष्टींवर घातली कायमची बंदी
3 Photo : अनिल कपूर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला
Just Now!
X