News Flash

काजोल म्हणते, ‘त्या’ नात्याविषयी बोलायला नको

नाती ही फार गुंतागुंतीची असतात

बॉलिवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री काजोल यांच्यातील मैत्रीमध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे.

बॉलिवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री काजोल यांच्यातील मैत्रीमध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. ऐ दिल है मुश्किल आणि शिवाय हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यामुळे करण आणि काजोलच्या मैत्रीत दुरावा आला होता. त्यांच्यातील या वादावर गेले बरेच दिवस बॉलीवूड वर्तुळात चर्चा होत होत्या.  करणने ‘अन सुटेबल बॉय’ या त्याच्या आत्मचरित्रामध्ये काजोल आणि त्याच्यातील मैत्रीचा उल्लेख केला होता. मात्र, त्यावेळी काजोलने याविषयी मौन बाळगणे पसंत केले होते. पण, आता एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत या ४२ वर्षीय अभिनेत्रीने भाष्य केले आहे. नाती ही फार गुंतागुंतीची असतात असे काजोलचे म्हणणे आहे.

याविषयी बोलताना काजोल म्हणाली की, नाती फार गुंतागुंतीची असतात, असे मला वाटते. याचा बॉलीवूडशी काहीही संबंध नाही. पण, करण जोहरसोबत जे काही झाले त्याविषयी मला काहीही बोलण्याची इच्छा नाही.  करणने ‘अन सुटेबल बॉय’ या आत्मचरित्रामध्ये काजोल सोबतच्या मैत्रीबद्दल लिहिताना म्हटलेले की, ‘ तिच्या पतीच्या चित्रपटामध्ये अडथळा आणण्यासाठी मी लाच दिल्याचे माझ्यावर आरोप केले जात आहेत. यामुळे मी दुखावलो गेलोय किंवा मला याचा त्रास होतोय, असेही मी म्हणू शकत नाही. मला फक्त हे सर्व पुसून टाकायचे आहे. या सर्व प्रकरणावर तिने ‘शॉकिंग’ असे ट्विट केले त्याचवेळी मी समजून गेलो की आता सर्व संपले आहे. ती माझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. मला वाटते तिलाही हेच हवे आहे. एका वेळी ती माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती, पण तिने माझ्या २५ वर्षाच्या मैत्रीकडे पाठ फिरवली आहे. माझ्या मनात तिच्याविषयी ज्या काही भावना होत्या त्या आता नष्ट झाल्या आहेत. आता माझ्या मनात तिच्यासाठी स्थान नाही.’ मात्र, इतके होऊनही काजोलने त्यावर काहीच खुलासा केला नव्हता. पण, काजोलचा पती आणि अभिनेता अजय देवगण याने गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात यावर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणालेला की, आमचे काही वाद आहेत. पण आमच्यातील वाद व्यावसायिक नसून पूर्णपणे खासगी आहेत आणि आमच्या या खासगी वादांबद्दल मला काहीही बोलायचे नाही.

‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ अशा विविध चित्रपटांच्या माध्यमातून काजोलने करणसोबत काम केले आहे. त्यांच्या मैत्रीची चर्चाही सर्वदूर सुरुच असते. कोणत्याही चित्रपटाच्या निर्मितीवेळी काजोल ही करणची पहिली पसंती असायची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 2:27 pm

Web Title: relationships are generally difficult kajol finally breaks silence on her fallout with best buddie karan johar
Next Stories
1 क्वीन-नवाबसह ‘रंगून’ गेला ‘कॉफी विथ…’चा खास भाग
2 आयोजकांकडून नेहाला असंवेदनशील वागणूक; स्टेजवरच कोसळले रडू
3 Shahid Kapoors pre-birthday bash : शाहिदसाठी मीरा बनली ‘होस्ट’
Just Now!
X