07 August 2020

News Flash

‘आता पुरे झालं’; बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्यांवर अखेर रियाने सोडलं मौन

सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर रियाला बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर अखेर अभिनेत्री रिया चक्रवर्तीने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर रियाला बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच धमकीचा स्क्रीनशॉट पोस्ट करत रियाने उत्तर दिलं आहे.

‘मला मारेकरी म्हटलं.. मी गप्प बसले, अर्वाच्च भाषेत मला शिवीगाळ केली.. मी गप्प बसले, मला फायदा उचलणारी म्हटलं.. मी गप्प बसले. पण मी गप्प बसले म्हणून, मी आत्महत्या केली नाही म्हणून माझा बलात्कार किंवा हत्या करण्याचा कोणता अधिकार तुम्हाला मिळतो? तू जे म्हणालीस त्या गोष्टीची गंभीरता तरी तुला ठाऊक आहे का? हा गुन्हा आहे आणि कायद्यानुसार कोणाचाही, मी पुनरुच्चार करते की कोणाचाही अशाप्रकारे छळ होऊ नये. आता पुरे झालं’, असं लिहित रियाने सायबर क्राइम सेलला कारवाईची विनंती केली आहे.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र तो नैराश्यात होता असं म्हटलं जात आहे. मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येचा तपास करत असून त्यांनी आतापर्यंत तीसहून अधिक लोकांचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये रियाचाही समावेश आहे. सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 1:06 pm

Web Title: rhea chakraborty replies to troll who gave her death rape threats after sushant singh rajput death ssv 92
Next Stories
1 ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात
2 दाक्षिणात्य अभिनेत्याला करोनाची लागण; पत्नीचे रिपोर्टही पॉझिटिव्ह
3 कलाकारांना जपणे गरजेचे, अभिनेत्रीची शूटिंग बंद करण्याची मागणी
Just Now!
X