25 February 2021

News Flash

सलमान अजूनही ‘सिंगल’

सलमानच्या चाहत्या असलेल्या मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

| November 29, 2013 12:47 pm

सलमानच्या चाहत्या असलेल्या मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रेमबंधनात अडकण्याची इच्छा असल्याचे खुद्द सलमानने व्यक्त केले आहे.
बॉलीवूडचा दबंग स्टार सलमानने करण जोहरच्या कॉफी विथ करण या टॉक शोमध्ये आपण अजूनही सिंगल असल्याचे सांगितले. मात्र, आपल्याला प्रेमात पडायला आवडेल, असेही तो म्हणाला. गेली तीन वर्षे या शोला टाळत असलेल्या सलमानने, शो दरम्यान प्रेम आणि लग्नाबद्दलच्या त्याच्या भावना व्यक्त केला. इतकेच नाही तर खोडकर सलमान सेटवर एकटाच झोपलासुद्धा.


सलमानची प्रेमप्रेकरण ही बॉलीवूडमधील बहुचर्चित विषय आहेत. माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी, कतरिना कैफ अशी त्याच्या प्रेमाच्या यादीतील नावे आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी रोमानियन सुंदरी लुलिया व्हेंतुरचे नावही समाविष्ट झाल्याची चर्चा होती. पण, सध्या तरी या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे दिसत नाही.
करण जोहरने पहिल्यांदाच त्याच्या खास मित्राला म्हणजेच शाहरुखला बोलावून शोला सुरुवात केलेली नाही. सलमानसोबत त्याचे वडिल सलीम खान या टॉक शोमध्ये सहभागी होणार आहेत. १ डिसेंबरपासून कॉफी विथ करण सुरु होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 12:47 pm

Web Title: salman khan is single again wants to be in a relationship
टॅग : Salman Khan
Next Stories
1 पाहाः आमिर-कतरिनाच्या ‘मलंग’ गाण्याचा टीझर
2 पाहा : ‘कामसूत्र थ्रीडी’ चित्रपटाचा ट्रेलर
3 बिग बॉस ७: कुशालने दिली प्रेमाची कबुली
Just Now!
X