अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर टीव्ही अभिनेत्री सारा खान हिने प्रतिक्रिया दिली. या ड्रग्ज प्रकरणामुळे माझ्यावर देखील काही जणांनी संशय व्यक्त केला होता. त्यावेळी मी स्वत:ला सावरलं नसतं तर कदाचित आत्महत्या केली असती, असा खळबळजनक वक्तव्य तिने केलं आहे.

अवश्य पाहा – कोटी कोटींची उड्डाणे… ‘बिग बॉस’च्या आशीर्वादाने करोडपती झालेले सेलिब्रिटी

आज तकला दिलेल्या मुलाखतीत साराने या ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, “या प्रकरणात काय खरं आहे अन् काय खोटं हे मला माहित नाही. पण मी देखील अंमली पदार्थांचं व्यसन करते असा संशय अनेकांनी व्यक्त केला होता. सोशल मीडियावरुन माझ्यावर जोरदार टीका होत होती. मी आजवर कधीही ड्रग्जचं सेवन केलेलं नाही. तरी देखील काही टीकाकारांनी ठरवून माझ्यावर चुकीचे आरोप केले. या नकारात्मक कॉमेंट्समुळे माझी मानसिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. कदाचित मी देखील आत्महत्या देखील केली असती. परंतु मी वेळेवर स्वत:ला सावरलं आणि टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. ज्या प्रमाणे तुम्ही कुटुंबातील स्त्रियांचा आदर करता त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक स्रीचा आदर करायला हवा.”

अवश्य पाहा – शाहरुख खानला मारलं म्हणून गुलशन ग्रोव्हर यांना ‘या’ देशाने नाकारला व्हिसा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत.

अवश्य पाहा – युपी पोलिसांनी राहुल गांधींवर केलेल्या लाठीचार्जवर स्वरा भास्कर संतापली, म्हणाली…

जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.