News Flash

Kundra Case: शिल्पाने काही महिन्यांपूर्वी तो निर्णय का घेतला?, तपास सुरु

राज कुंद्राच्या कंपनीत भागीदार असलेल्या शिल्पा शेट्टीवर पोलिसांची संशयाची सुई फिरत असतानाच एक मोठी माहिती समोर आलीय.

shilpa-shetty-resigned

राज कुंद्रा अश्लील व्हिडीओ प्रकरणात त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुद्धा यात सहभाग आहे का? याचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या हालचालींना वेग आला असतानाच एक मोठा खुलासा समोर आलाय. अश्लील व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला अटक केल्यानंतर त्याच्या अनेक कंपनीत भागीदार असलेल्या शिल्पा शेट्टीवर पोलिसांची संशयाची सुई फिरत होती. यासाठी पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घराची झडती घेऊन तब्बल ६ तास शिल्पा शेट्टीची चौकशी केली. त्यानंतर मुबंई पोलिसांची गुन्हा शाखा लवकरच शिल्पा शेट्टीला समन्स बजावणार अशी चर्चा सुरू असतानाच एक मोठा गौप्यस्फोट समोर आलाय.

अश्लील व्हिडीओ प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या राज कुंद्राच्या कित्येक व्यवसायांमध्ये त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही भागीदार आहे. त्यामूळे त्याच्या कंपनीतून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा समावेश आहे का? यावर पोलिसांनी त्यांचा तपास सूरू केलाय. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ‘शिल्पा योग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमध्ये राज कुंद्रा हा डायरेक्टर असल्याचं दाखवण्यात आलंय. परंतु पोलिसांच्या तपासात तो या कंपनीचा डायरेक्टर नसल्याचं उघड झालंय. त्याचप्रमाणे राज कुंद्रा याच्या जवळपास २३ कंपन्यांमध्ये शिल्पा शेट्टी भागीदार आहे. तसंच ज्या कंपनीमधून हा सर्व प्रकार सुरू होता त्या व्हिआन कंपनीत सुद्धा अभिनेत्री शिल्पा शेट्टी डायरेक्टर पदावर होती. त्यामूळे या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुद्धा सहभाग असू शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने काही महिन्यांपूर्वीच राज कुंद्राच्या ‘विआन इंडस्ट्रीज’ मधून राजीनामा दिल्याची मोठी माहिती समोर आलीय. त्यामूळे शिल्पा शेट्टी आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या कंपनीत किती दिवस डायरेक्टर पदावर होती, या दरम्यान तिने किती कमाई केली आणि पतीच्याच कंपनीतून तिने राजीनामा का दिला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या दृष्टीने पोलिसांनी आपला तपास सुरू केलाय. यासाठी पोलिस शिल्पा शेट्टीचे बॅंक अकाउंट्स सुद्धा तपासणार आहेत, असं बोललं जातंय. त्यामूळे सहा तासांच्या चौकशीनंतर शिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा पोलिस चौकशीसाठी बोलवतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

शिल्पा शेट्टीच्या खात्यात जमा सट्टेबाजीची कमाई ?

एका मीडिया रिपोर्टनुसार, राज कुंद्राचा अडल्ट अ‍ॅप हॉटशॉट्स आणि यातील अश्लील व्हिडीओबाबत शिल्पा शेट्टीला पूर्णपणे कल्पना होती, असं सांगितलं जातंय. कारण राज कुंद्राच्या अ‍ॅपमधून होणाऱ्या कमाईच्या रक्कमेचं अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बॅंक खात्यात सुद्धा ट्रांजेक्शन झाल्याचं समोर आलंय.

फॉरेन्सिक एक्सपर्ट्स सुद्धा लागले कामाला

क्राइम ब्रांच विआन इंडस्ट्रीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केलीय. तसंच सर्व्हरमधून डाटा कुणी डिलीट केला याचा तपास सुद्धा पोलिसांनी सुरू केलाय. सर्व्हरमधून डिटील केलेला डाटा रिस्टोर होतोय का, यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. क्राइम ब्रांचकडून अद्याप तरी शिल्पा शेट्टी कोणत्या प्रकारची नोटीस पाठवण्यात आलेली नाही. शिल्पा शेट्टी सुद्धा कोणत्याच शूटिंगसाठी बाहेर न पडता आपल्या कुटुंबासोबत घरीच राहतेय.

राज कुंद्रांच्या घरात पोलिसांना गुप्त कपाट सापडल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. “अश्लील चित्रपट निर्मित प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांना शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विआन आणि जे.एल. स्ट्रीम कंपनीच्या कार्यालयात एक लपवलेलं कपाट सापडलं आहे. तसंच शिल्पा शेट्टीच्या जवळच्या व्यक्तीच्या हवाल्याने ई-टाइम्सनं वृत्त दिलं आहे. ज्यात “शिल्पा सध्या कोणत्याच गोष्टीवर बोलणार नाही. या प्रकरणाची सगळ्यांना अर्धवट माहिती आहे. कृपया करून पूर्ण माहिती काढल्याशिवाय बोलू नका. आधी खात्री करून घ्या आणि नंतरच विश्वास ठेवा”, असं त्या व्यक्तीनं म्हटल्याचं सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2021 3:07 pm

Web Title: shilpa shetty resigned from raj kundras company cops investigating prp 93
Next Stories
1 ‘बिग बॉस’ फेम याशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू
2 मिराबाई चानूचे अभिनंदन केल्यानंतर टिस्का चोप्रा ट्रोल झाली; कारण…
3 Indian Idol 12: सुप्रसिद्द अभिनेत्री रीना रॉयने केला अनु मलिकच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा
Just Now!
X