15 January 2021

News Flash

चित्रिकरण सुरु असताना श्रद्धाला अश्रू झाले अनावर

बहिणीला सांभाळता सांभाळता सिद्धार्थच्याही डोळ्यात शेवटी अश्रू आले.

श्रद्धा कपूर

बॉलीवूडमध्ये ‘आशिकी २’ चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्यावर बनत असलेल्या चित्रपटात ती काम करत आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान असे काही झाले की श्रद्धाला रडूच कोसळले. एक दृश्य चित्रीत करत असताना श्रद्धा भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, श्रद्धा इतकी भावूक झाली होती की तिचे अश्रू थांबतच नव्हते. श्रद्धाचं रडू थांबविणे कठीण असल्याचे कळताच दिग्दर्शक अपूर्व लाखियाने एक तास चित्रिकरण थांबविण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर हा दाऊदची भूमिका साकारत आहे. त्यावेळी सिद्धांतही तेथेच असल्यामुळे त्यानेच अखेर श्रद्धाला सांभाळले. पण, बहिणीला सांभाळता सांभाळता सिद्धांतच्याही डोळ्यात शेवटी अश्रू आले. याविषयी बोलताना अपूर्व लाखिया म्हणाला की, सिद्धांत आणि श्रद्धा जेव्हा भावूक झालेले तेव्हा त्यांना पाहून सेटवर उपस्थित सर्व जण चकित झाले. दोघा भावा-बहिणीमध्ये किती प्रेम आणि जवळीक आहे याचाच सर्वजण विचार करत होते. त्यावेळी सर्वजण एकदम शांत झाले होते. मग आम्ही त्या दोघांनाही काही वेळासाठी एकट सोडलं.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेली दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्यावर चित्रपट काढण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील दाऊदची बेनामी मालमत्ता सांभाळणाऱ्या हसीना हिचा ‘दाऊदची बहीण’ म्हणून दबदबा होता़. नागपाडा येथील आलिशान ‘गॉर्डन हाऊस’मध्ये वास्तव्याला असलेल्या हसीनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ती दाऊदच्या सर्वात जवळ होती. तसेच, तिची जीवनकथाही रंजक असल्याने दिग्दर्शक अपूर्व लाखिया तिच्या जीवनावर ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ हा चित्रपट काढत आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही हसीना पारकरची भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 1:25 am

Web Title: shraddha kapoor breaks down in tears while shooting for haseena biopic
Next Stories
1 सिने ‘नॉलेज’: जॅकी श्रॉफला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक कोणी दिला होता?
2 बॉलीवूड अभिनेत्याने तब्बल एक वर्षानंतर केला लग्न केल्याचा खुलासा
3 १७ फेब्रुवारीला भरणार हळुवार प्रेमाचं ‘रांजण’
Just Now!
X