01 December 2020

News Flash

‘ती इच्छा अपूर्णच राहिली’; सुशांतसाठी ‘गली बॉय’ फेम अभिनेत्याची भावनिक पोस्ट

'जब तुम थे, हम कुछ नहीं थे, अब हम है, तो तुम नही'

सुशांत सिंह राजपूत, सिद्धांत चतुर्वेदी

‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. रविवारी (१४ जून) सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला भेटायची इच्छा अपूर्णच राहिली असल्याचं म्हणत सिद्धांतने इन्स्टाग्रामवर चार ओळी लिहिल्या आहेत.

‘जब तुम थे, हम कुछ नहीं थे, अब हम है, तो तुम नही, सोचा था.. मिलकर भोजपुरी मे बतियांएंगे तुमसे गुरू.. बलियाँ से पटना इतना भी दूर नहीं’ (जेव्हा तू होतास, तेव्हा मी काहीच नव्हतो, आता मी आहे तर तू नाहीस. तुझ्याशी भेटून भोजपुरी भाषेत गप्पा मारायच्या होत्या. बलियाँपासून पाटणा इतकासुद्धा दूर नाही.) अशी पोस्ट त्याने लिहिली.

सुशांत मूळचा बिहारमधील पाटणा इथला असून सिद्धांत उत्तरप्रदेशमधील बलियाँ इथला आहे. सुशांतला भेटून जो फोटो दाखवायची इच्छा सिद्धांतला होती, तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने श्रद्धांजली वाहिली होती. या फोटोमध्ये त्याच्यासोबत सुशांत व अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पाहायला मिळतेय. ‘हा फोटो खूप खास आहे. विचार केला की जेव्हा कधी पुन्हा भेटेन तेव्हा तुला दाखवेन आणि विचारेन.. तुला आठवलं का? मी तोच मुलगा आहे. इथूनच माझा प्रवास सुरू झाला होता आणि या प्रवासात तू नेहमीच सोबत राहशील’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या होत्या.

सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तो नैराश्यात होता असं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 4:59 pm

Web Title: siddhant chaturvedi shares unfulfilled wish of meeting sushant singh rajput one ssv 92
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांचे आभार मानत देवदत्त नागे म्हणाला..
2 Video : भावूक झालेल्या अंकिता लोखंडेने घेतली होती एकता कपूरची भेट
3 भूमिका निवडताना जितेंद्र करतो ‘या’ गोष्टींचा विचार!
Just Now!
X