News Flash

‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

टायगर श्रॉफचे अॅक्शन सीन, तारा आणि अनन्याचा ग्लॅमरस अंदाज

'स्टुडंट ऑफ द इअर २'

दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटाची घोषणा केल्यापासून चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. हा पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळाला आहे. आता चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात टायगर श्रॉफ सह अनन्या पांडे आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महाविद्यालयाचा स्टुडंट ऑफ द इअर होण्यासाठी टायगर श्रॉफचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. तसेच टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्यामध्ये प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातील टायगर श्रॉफचा ‘दिन तेरा था साल मेरा है’ हा डायलॉग लक्षवेधी ठरला आहे.

या चित्रपटातून अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ हा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होत आहे.

‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. याच चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुमारे ७५ कोटींची कमाई करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. आता सीक्वलच्या दिग्दर्शनाची धुरा पुनीत मल्होत्रावर आहे. पुनीतने याआधी ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘गोरी तेरे प्यार मैं’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 1:49 pm

Web Title: student of the year 2 movie trailer released
Next Stories
1 ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या निर्मात्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
2 मुन्नाभाईची भूमिका मी नाकारल्यानंतर संजय दत्तच्या पदरात पडली- विवेक ओबेरॉय
3 एकता कपूरला गुरू मानतो ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता
Just Now!
X