पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. आज १३ मे रोजी सनीचा वाढदिवस आहे. सनीने सुरुवातीला अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर सनी भारतात आली. सनीचे ‘बेबी डॉल’ हे आयटम साँग हिट ठरले. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदललं. त्यातही ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात तिने सहभाग घेतला. यावेळी खऱ्या आयुष्यात सनी कशी आहे, हे प्रेक्षकांना समजलं. आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या सनीच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्ही थक्क व्हाल.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सनीचा मुंबईतील बंगला, अमेरिकेतील फ्लॅट, महागड्या गाड्या हे सर्व मिळून एकूण ९७ कोटींची ती मालकीण आहे. काही वर्षांपूर्वीच सनीने अमेरिकेत फ्लॅट विकत घेतला. त्याची किंमत ३० कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं. तर मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत ३ कोटी इतकी आहे.
आणखी वाचा : मलायकाने केला अनुराग बासूसोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
२०११मध्ये सनीने डॅनियल वेबरशी लग्न केले. त्यांची पहिली ओळख एका पार्टीमध्ये झाली होती. काही वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१७मध्ये त्यांनी निशाला दत्तक घेतले आणि २०१८मध्ये सरोगसीने त्यांना दोन जुळी मुले झाली. अनेक वेळा सनी तिच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.