News Flash

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टप्पू आज आहे बेरोजगार

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील टप्पू उर्फ भव्यचा आज २४ वा वाढदिवस आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील टप्पू उर्फ भव्यचा आज २४ वा वाढदिवस आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहे. या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधीचा आज २० जून रोजी वाढदिवस आहे. आज टप्पू २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य बद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : ‘अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती बोलायचे; माझ्या गाण्यांमुळे…’, अभिजीत भट्टाचार्य

भव्यला खरी ओळख ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून मिळाली. लहान वयापासून भव्य या मालिकेत टप्पूची भूमिका साकारत होता. त्या भूमिकेमुळे खऱ्या आयुष्यात देखील भव्यला लोक टप्पू म्हणून हाक मारायचे. परंतु यशाच्या शिखरावर असताना भव्यने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या करिअरमधील सर्वात चुकीचा निर्णय होता असे म्हटले जाते. कारण कधीकाळी या मालिकेमुळे लाखोंची कमाई करणार टप्पू आज बेरोजगार होऊन घरात बसला आहे.

आणखी वाचा : ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhavya Vinod Gandhi (@bhavyagandhi97)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळं भव्य गांधीची लोकप्रियता कोणत्या सुपरस्टार पेक्षा कमी नव्हती. भव्यची लोकप्रियता पाहता त्याला गुजराती चित्रपटांच्या ऑफर देखील येत होत्या. तर, मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी भव्यने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांनी टप्पूने मालिका सोडू नसे म्हणून अनेक प्रयत्न केले. मात्र, भव्यला एकच भूमिका अनेक वर्ष साकारण्यास कंटाळ आला होता आणि त्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : ‘तू तिसरं लग्न करणार आहेस?’ श्वेता तिवारी झाली ट्रोल

मालिका सोडल्यानंतर भव्यने एका गुजराती चित्रपटात काम केले. परंतु तो चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. तेव्हापासून भव्यला काम मिळाले नाही आणि तो बेरोजगार झाला. तर, वडिलांचे करोनामुळे निधन झाल्यामुळे घराचा संपूर्ण भार हा आता भव्यवर आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:54 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah fame bhavya gandhi is now jobless dcp 98
Next Stories
1 ‘अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती बोलायचे; माझ्या गाण्यांमुळे…’, अभिजीत भट्टाचार्य
2 Happy Father’s Day 2021: बॉलिवूडकर असा साजरा करत आहेत फादर्स डे; सोशल मीडियावर शेअर केले फोटोज
3 पत्नीला त्रासदायक म्हणणाऱ्या नेटकऱ्याला, शोएबने दिले सडेतोड उत्तर
Just Now!
X