News Flash

करण जोहरच्या ‘दोस्ताना-2’मध्ये कार्तिक आर्यनच्या जागी ‘या’ अभिनेत्यांची एण्ट्री

'दोस्ताना-2' साठी नव्या चेहऱ्यांची चर्चा

करण जोहरच्या ‘दोस्ताना-2’ मधून कार्तिक आर्यनचा पत्ता कट झाल्यानंतर आता कार्तिकच्या जागी कुणाची वर्णी लागणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. वृत्तानुसार प्रोडक्शन हाउसला कार्तिकचं वागणं पटत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. कार्तिकला या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये अनेक समस्या असल्याचं वाटतं होतं. यानंतर आता या सिनेमासाठी दोन उत्तम कलाकारांची नावं चर्चेत आली आहेत.

करण जोहरच्या ‘दोस्ताना-2’ साठी अभिनेता विकी कौशल आणि राज कुमार राव य़ांच्या नावाची चर्चा आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या सिनेमात कार्तिकच्या जागी विकी कौशलची एण्ट्री होऊ शकते. जर विकी कौशलला शक्य झालं नाही तर राजकुमार रावची वर्णी लागू शकते. विकी कौशल नुकताच करोनातून बरा झालाय. करोना होण्यापूर्वी तो ‘मिस्टर लेले’ सिनेमाचं शूटिंग करत होता. या शिवाय त्याच्याकडे अजून दोन सिनेमा आहेत.

‘दोस्ताना-2’  या सिनेमाचं 50 टक्के शूटिंग मुंबई आणि चंदिगढवध्ये पूर्ण झाल्याचं वृत्त आहे. यापूर्वी लंडनमध्ये सिनेमाचं शूटिंग होणार होतं. मात्र करोनाच्या परिस्थितीमुळे भारतातच शूटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, धर्मा प्रोडक्शनने एक नोट जारी केली आहे. यात कलाकारांविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलीय. यात “व्यावसायिक कारणास्तव आम्ही दोस्ताना-2 या सिनेमाची रिकास्टिंग करणार आहोत. अधिकृत घोषणेसाठी प्रतिक्षा करा.” असं सांगण्यात आलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 3:54 pm

Web Title: vicky kaushal or rajkumar rao will replace kartik aaryan in kanran johars dostana 2 kpw 89
Next Stories
1 ‘सुशांतसारखे कार्तिकलाही आत्महत्येस…’, कंगनाचे ट्वीट चर्चेत
2 ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपाला डान्सचे डोहाळे, गरोदरपणातही करतेय डान्स
3 ‘हे सर्व तर…’, कुंभमेळ्यातील गर्दी पाहून संतापली मलायका
Just Now!
X