News Flash

स्विमिंग कॉश्च्यूममधील अनुष्काच्या हॉट फोटोवर विराटची प्रतिक्रिया; म्हणतो…

अनुष्काने इन्टाग्रामवर हा फोटो केला आहे पोस्ट

विराट आणि अनुष्का

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या लॉकडाउनच्या काळामध्येही चर्चेत आहे ती वेबसिरीजमुळे. मोठ्या पडद्यावर अनुष्का आता कधी आणि कोणासोबत दिसणार यासंदर्भातील माहिती अद्याप तिने आपल्या चाहत्यांना दिलेली नाही. असं असलं तरी सोशल मिडियावर सध्या अनुष्काची चांगलीच चर्चा आहे. अनुष्काने नुसता स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला. हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला असल्याचे फोटोवरील लाइक्स आणि कमेंटवरुन दिसून येत आहे. या चाहत्यांमध्ये एका खास व्यक्तीचा समावेश आहे. ही व्यक्ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अनुष्काचा पती विराट कोहली. विराटलाही अनुष्काचा हा फोटो पाहून कमेंट करण्याचा मोह आवरला नाही.

अनुष्का सोशल मिडियावर प्रचंड अॅक्टीव्ह आहे. मात्र सध्या तिने शेअर केलेला फोटो हा अगदीच हटके लूकमधील आहे. एका हॉट फोटो शूटमधील अनुष्काचा फोटो वोग मासिकाच्या मुखपृष्ठावर वापरण्यात आला आहे. यामध्ये अनुष्का स्विमिंग कॉश्यूम घालून खूपच सुंदर दिसत आहे. पाण्यामध्ये मांडी घालून बसलेल्या अनुष्काचे भिजलेले केस आणि बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकांनी कमेंटमधून अनुष्काच्या बोल्ड अदांचे कौतुक केलं आहे.

सोशल नेटवर्किंगवर सध्या चर्चेत असणारा हा फोटो पाहून विराटनेही त्यावर कमेंट केली आहे. आपल्या बायकोच्या फोटोवर विराट इमोन्जीच्या मदतीने व्यक्त झाला आहे. त्याने फायर, हार्ट आणि इमोन्जी पोस्ट करत कमेंट केली आहे. यामधून विराटला अनुष्का खूपच हॉट दिसत असल्याचे सांगायचं आहे.

अनुष्का सध्या ‘बुलबुल’ आणि ‘पाताल लोक’ या दोन वेब सिरीजमुळे चांगलीच चर्चेत आहे. निर्मिती क्षेत्रामध्ये अनुष्काने पदार्पण केलं असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या दोन्ही सिरीज अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती आहेत. या दोन्ही वेब सिरिजला नेटकऱ्यांची चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनुष्का सध्या मोठ्या पडद्यापासून लांब आहे. ती शेवटची शाहरुख खान सोबतच्या झिरो चित्रपटामध्ये दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 4:08 pm

Web Title: virat kohli comments on anushka sharma s photo scsg 91
Next Stories
1 तारक मेहताचे नवे भाग कधी येणार; निर्माता आसित मोदी म्हणाले…
2 सुशांतच्या मेहुण्याचा घराणेशाहीवर ‘नेपोमीटर’ने हल्लाबोल
3 सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची होणार पोलिसांकडून चौकशी
Just Now!
X