२०२२ संपलं आणि २०२३ सुरु झालं, नव्यावर्षाचं स्वागत सामान्य जनतेपासून ते अगदी बॉलिवूडच्या कलाकारांपर्यंत सगळयांनी अगदी जोशात केलं आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त बॉलिवूडचे सेलिब्रेटी परदेशात गेले आहेत. हृतिक रोशन कथित प्रेयसी सबा आझाद आणि मुलांना घेऊन यूरोपला गेला आहे. तर सैफ अली खानचं कुटुंब स्वित्झर्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत. यांच्याबरोबरीने आणखीन एक अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. ती सध्या थायलंड येथे गेली असून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत आहे. तिचे मित्र मैत्रिणीदेखील बरोबर आहेत. बॉलिवूडचे स्टार किड्स सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आर्यन खान सुहाना खान आणि अनन्या पांडे हे नाव सातत्याने समोर येत असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनन्याचा मागच्या वर्षी ‘लाइगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता मात्र हा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. चित्रपटाला टीकेचा सामना करावा लागला होता. अनन्याने आयुष्मान खुरानाबरोबरच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं. तसेच झोया अख्तर आणि रीमा कागती लिखित ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं अनन्याने पोस्ट करत सांगितलं आहे.